scorecardresearch

पोलीस

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्ही पोलिस विभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांसंबंधित महत्त्वाच्या बातम्या वाचू शकता. पोलिस (Police)हे एक सुरक्षा दल आहे; ज्यांचे काम देशांतर्गत नागरी सुरक्षा राखणे हे असते. पोलिस दल हे गृहसंरक्षण विभागाच्या अखत्यारीत काम करते. देशाचा कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर असते. गुन्हेगारी कारवाया थांबवणे, गुन्हेगारांना अटक करणे, गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगार कोण आहे हे शोधणे आणि त्यांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करणे हीदेखील पोलिसांची कामे आहेत. परंतु, गुन्हेगारांना शिक्षा करणे हे पोलिसांचे काम नाही. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी न्यायालयासमोर संबंधित भक्कम पुरावे आणि माहिती पोलिसांना द्यावी लागते. याआधारावरच न्यायालय एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार घोषित करू शकते.


महाराष्ट्र पोलिस ही महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. हे देशातील सर्वांत मोठ्या पोलिस दलांपैकी एक आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांना नष्ट करण्यास महाराष्ट्र पोलिस कटिबद्ध आहेत, असा या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे. महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख पोलिस महासंचालक हे असून, मुंबई येथे राज्याचे पोलिस मुख्यालय आहे. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र पोलिस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी निवडले जातात. तर, शिपाई व तत्सम पदांसाठी वेळोवेळी पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाते. पोलिस दलाच्या विविध कामगिऱ्या, गुन्हेगारी, पोलिस भरती यांसह विविध विषयांसंबंधी सर्व प्रकारच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. स्थानिक गुन्हेगारीपासून देश पातळीवरील गुन्हेगारीपर्यंत सर्व माहिती तुम्हाला येथे एका क्लिकवर वाचायला मिळेल.


Read More
kalyan police marathi news, kolsewadi police marathi news
कल्याण, ठाणे, मुंबईत १४ वर्ष घरफोड्या करणारा सराईत चोरटा कोळसेवाडी पोलिसांकडून अटक

ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात मागील १४ वर्ष घरफोड्या करणाऱ्या एका सराईत चोरट्याला येथील कोळसेवाडी पोलिसांनी शिताफीने अटक…

Nandurbar, police inspector,
नंदुरबार : वादग्रस्त पोलीस निरीक्षकाविरोधात जमाव संतप्त, कारण…

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना नंदुरबार जिल्हा बुधवारी रात्री वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आला. जिल्ह्यातील नवापूर पोलीस ठाण्याचा निरीक्षकच लाच घेताना…

pune cp amitesh kumar marathi news
पोलीस आयुक्तांचा गुंडांना इशारा : म्हणाले, “पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ नाही, आता ‘हा’ पॅटर्न…”

मुळशी पॅटर्न चित्रपटातील दृश्याप्रमाणे पुण्यात गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेने गुंडांची झाडाझडती घेणयास सुरू केली.

thane police officer arrested marathi news
ठाणे: दोन लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह दोघे ताब्यात

पोलीस उपनिरीक्षक तुषार पोतेकर (४०) आणि पोलीस हवालदार माधव दराडे (४९) अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत.

Mahavitaran Employee, Fatally Attacked, High Electricity Bill, Inquiry, murder in pune, murder in baramati, Mahavitaran Employee attacked, Mahavitaran Employee murder, barmati news, marathi news, pune news, mahavitaran news, police,
बारामती : महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याचा कोयत्याने १६ वार करून खून, विजेचे बिल जास्त आल्याने ग्राहकाकडून हल्ला

घरातील विजेचे बिल जास्त येते म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या ग्राहकाने मोरगाव (ता. बारामती) येथील महावितरण कार्यालयात तांत्रिक महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने…

nalasopara, tulinj police, Crack Down on Landlords, Renting to Foreign Nationals, Without Permission, Renting Foreigners Without Permission, nalasopara news, marathi news, police
परदेशी नागरिकांना भाड्याने घरे देणार्‍यांवर कारवाई, तुळींज पोलिसांनी २५ घर मालकांवर दाखल केले गुन्हे

परदेशी नागरिकांना पोलिसांच्या परवानगीशिवाय परस्पर घरे भाड्याने देणार्‍यांविरोधात पोलिसांनी पुन्हा कारवाई सुरू केली आहे. नालासोपारा मधील तुळींज पोलिसांनी अशा प्रकरणात…

nashik, police, complainants
नाशिक : जप्त एक कोटीचा मुद्देमाल पोलिसांकडून तक्रारदारांना परत

चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. बुधवारी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मुद्देमाल प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला.

Assistant Police Inspector promoted soon
आनंदाची बातमी! सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती

पोलीस महासंचालक कार्यालय आणि गृहमंत्रालयात योग्य समन्वयाच्या अभावाने गेल्या अडीच वर्षांपासून पदोन्नतीच्या कक्षेत असूनही सहायक पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात…

mira bhaindar riot case marathi news, mira bhaindar violence marathi news
मिरा-भाईंदर येथील दंगलीनंतरचे प्रक्षोभक भाषणाचे प्रकरण : आमदार नितेश राणे आणि गीता जैनविरोधात गुन्हा प्रीमियम स्टोरी

या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.

food and drugs police uniform marathi news
अन्न व औषध प्रशासनातही पोलिसांप्रमाणे गणवेश? राज्य शासनाला प्रस्ताव सादर

अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना पोलिसांप्रमाणे प्रशिक्षण व गणवेश देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

dhule srpf marathi news,
धुळे: गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक ताब्यात

पारसकर यांनी त्या सर्व कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपयाप्रमाणे एकूण पाच हजार रुपये आणून द्यावेत, असे संबंधित तक्रारदार यांना सुचविले.

Pune, Citizens rewarded, missing school girl,
पुणे : बेपत्ता शाळकरी मुलीची माहिती देणाऱ्या नागरिकांना पोलीस आयुक्तांकडून बक्षीस

नांदेड सिटी परिसरातून बेपत्ता झालेल्या शाळकरी मुलीची माहिती देणाऱ्या नागरिकांच्या सतर्कतेचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कौतुक केले.

संबंधित बातम्या