scorecardresearch

कसोटी क्रिकेट

कसोटी क्रिकेट (Test Cricket) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या सदस्य देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघांदरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा प्रथम श्रेणी क्रिकेटचा एक प्रकार आहे. यामध्ये एका सामन्यात प्रत्येक संघाला दोन असे चार डाव असतात. कसोटी सामना हा पाच दिवसांपर्यंत चालतो. पूर्वी कसोटी सामन्यांना वेळेचे मर्यादा नव्हती. मुळात क्रिकेटचा उदय झाल्यानंतर १८६१-६२ मध्ये टेस्ट मॅच किंवा कसोटी सामना हा शब्द वापरायला सुरुवात झाली. पण या शब्दाचा आणि कसोटी सामन्याचा तसे पाहता फारसा संबंध नव्हता. १८७७ पासून आंतरराष्ट्रीय सामन्यांना कसोटी सामन्यांचा दर्जा देण्यात आला.


असा पहिला आंतरराष्ट्रीय दर्जा असलेला सामना हा १५ मार्च १८७७ रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंट (एमसीजी) येथे खेळण्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (ब्रिटिश व्यावसायिकांचा संघ) यांच्यात खेळला गेला. पुढे १८९२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यांना प्रथम कसोटी सामने असे म्हटले गेले. पुढे कसोटी क्रिकेट हा शब्द प्रचलित झाला. सध्या जगभरातील १२ देश आयसीसीचे पूर्ण सदस्य असून कसोटी क्रिकेट खेळत आहेत. १९३२ मध्ये भारताने कसोटी सामने खेळायला सुरुवात केली. आधी हे सामने फक्त दिवसा खेळले जात असत. २०१२ मध्ये आयसीसीने डे-नाइट कसोटी सामन्यांना परवानगी दिला. त्यानंतर ३ वर्षांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अ‍ॅडलेड ओव्हल येथे पहिला डे-नाइट कसोटी सामना खेळला गेला. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाप्रमाणे कसोटी क्रिकेटची सुद्धा लीग असावी असा प्रस्ताव २००९ पासून आयसीसीकडे केला जात होता.


एकूण दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटच्या लीग स्पर्धेचे म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले. २०१९-२१ या वर्षातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेते न्यूझीलंडचा कसोटी संघ ठरला. तसेच २०२१-२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले. दोन्ही वर्षांमध्ये उपविजेतेपद हे भारताकडे होते.


Read More
India Vs Australia Test Series 2024 Schedule Announced
IND vs AUS Test : भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ मैदानांवर खेळले जाणार पाच सामने

India Vs Australia Test Series 2024 : भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ नोव्हेंबर २०२४ पासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी लढतील. २२ नोव्हेंबरपासून…

India Australia first Test match likely to be held in Perth sport news
भारत- ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी पर्थला?

 भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या बहुप्रतीक्षित मालिकेतील पहिला सामना पर्थला होण्याची शक्यता आहे.

Tamil Nadu Cricket Association awards Indian cricketer Ravichandran Ashwin Rs 1 crore
Ravichandran Ashwin : तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून अश्विनचा गौरव! १ कोटी रुपयांसह ५०० सोन्याची नाणी भेट

Ravichandran Ashwin : तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनचा सन्मान केला. त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील विशेष कामगिरीसाठी अनेक भेटवस्तू…

ICC Player of the Month Award Won Yashasvi Jaiswal
Player of the Month : यशस्वी जैस्वालने पटकावला आयसीसीचा पुरस्कार, विल्यमसन आणि निसांकाला टाकले मागे

Player of the Month Award : यशस्वी जैस्वालला आयसीसीने मोठा पुरस्कार जाहीर केला आहे. त्याला फेब्रुवारी महिन्याचा आयसीसी ‘प्लेयर ऑफ…

Australia beat New Zealand by 3 wickets in 2nd Test match
NZ vs AUS : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय, न्यूझीलंड ३१ वर्षांचा दुष्काळ संपवण्यात अपयशी

New Zealand vs Australia Test Series : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी करत न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकली. मिचेल…

Nasser Hussain's reaction to England's defeat
IND vs ENG : कसोटी मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर नासेर हुसैन संतापला; म्हणाला, ‘Bazball’मुळे इंग्लंड…

Nasser Hussain’s reaction : भारताने पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा एक डाव आणि ६४ धावांनी दणदणीत पराभव…

Rohit Sharma's Reaction to BCCI's Scheme
‘BCCI’ने कसोटी क्रिकेटसाठी जाहीर केलेल्या योजनेवर रोहित शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला…

Rohit Sharma’s Reaction : रोहित शर्मा बीसीसीआयच्या कसोटी प्रोत्साहन योजनेवर खूप आनंदी आहे. बीसीसीआयच्या या योजनेमुळे कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंना आता…

Ravichandran Ashwin equals with Muttiah Muralitharan record
IND vs ENG : रविचंद्रन अश्विनची ऐतिहासिक कामगिरी! १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच

Ravichandran Ashwin’s 100th Test : इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना हा रविचंद्रन अश्विनचा १०० वा कसोटी सामना होता. अश्विनने या सामन्यात…

Team India top spot in the ICC WTC rankings
Team India : भारतीय संघाने रचला इतिहास, ‘ICC’च्या तिन्ही फॉरमॅटच्या क्रमवारीसह ‘WTC’मध्येही ठरला नंबर वन!

ICC Team Rankings : आयसीसी कसोटी संघ क्रमवारीत टीम इंडिया पुन्हा अव्वल स्थानावर आली आहे. या मालिकेतील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे…

Glenn McGrath advises Mohammed Shami should learn from James Anderson how to maintain fitness as he ages
Mohammed Shami : शमीला वाढत्या वयात फिटनेस कसा राखायचा अँडरसनकडून शिकायला हवे, माजी दिग्गजाचा सल्ला

Glenn McGrath advises Mohammed Shami : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या राष्ट्रीय संघातून…

Top 5 batsmen to hit most sixes in WTC
9 Photos
PHOTOS : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारे टॉप-५ फलंदाज

Most Sixes in WTC : डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूच्या टॉप-५ तीन भारतीय आणि दोन इंग्लंडच्या खेळाडूंचा समावेश आहे. या…

England and India hold the record for most sixes in a Test series
IND vs ENG Test Series : भारत-इंग्लंडने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘हे’ घडलं

India vs England Test Series : भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी या मालिकेत भरपूर चौकार आणि षटकार मारले. त्यामुळे ही कसोटी…

संबंधित बातम्या