scorecardresearch

ठाणे

ठाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोकण विभागामध्ये या जिल्ह्याचा समावेश होतो. ठाणे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या उत्तरेला वसलेले आहे. ठाणे शहरामध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. याच्याजवळच मुंबई महानगर प्रदेश (MMR)चा भाग देखील आहे.

ठाण्याचा उल्लेख तिसऱ्या शतकात मौर्य साम्राज्यामध्ये आढळतो. सातवाहन, चालुक्य, पोर्तुगीज यांच्यासह विविध राजवटींनी ठाण्यावर राज्य केले. आज ठाणे हे सुमारे १.८ दशलक्ष लोकांनी गजबजलेले शहर आहे.<br />
नौकाविहार आणि सहलीसाठी प्रसिद्ध असलेले उपवन तलाव हे ठाण्यातील प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय केळवा चौपाटी, येऊर हिल्स अशा ठिकाणीही लोक फिरायला जातात. सर्फिंग, वॉटर स्पॉर्ट्ससाठी केळवा चौपाटी प्रसिद्ध आहे. तर येऊर ही जागा तिच्या नैसर्गिक सौदर्यासाठी लोकप्रिय आहे.

हिंदू संस्कृती आणि मराठी सण हे ठाण्याची ओळख आहेत. येथे गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी आणि होळी असे सण जल्लोषात साजरे केले जातात.

ठाण्यामध्ये रस्ते, रेल्वे यांसह हवाई मार्गांचे जाळे आहे. यांच्यामार्फत हे शहर महाराष्ट्रातील अन्य शहरांशी जोडले गेले आहे. भारतातील प्रमुख ठिकाणांना जोडणारी उत्तम विकसित पायाभूत सुविधा ठाण्यामध्ये आहेत. ठाण्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या ठाणे कॅम्पससह अनेक शैक्षणिक संस्था आहेत. याशिवाय मोठमोठी अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेली रुग्णालयेही या शहरामध्ये आहेत. ठाणे हे आरोग्य सेवा केंद्रांचे घर बनले आहे.

सांस्कृतिक वारसा लाभलेला ठाणे हा जिल्हा नैसर्गिकरित्या समृद्ध आहे. विविध सुविधा आणि सेवा असलेले ठाणे शहर तेथील रहिवाश्यांसाठी अनुकूल आहे. पर्यटकांसाठीही ही जागा आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

ठाणे कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: उपवन किल्ला, घोडबंदर किल्ला यांसारखे ऐतिहासिक किल्ले; उपवन तलाव, ठाणे खाडी, मासुंदा तलाव (तलाव पाली) अशा ठिकाणांसाठी ठाणे प्रसिद्ध आहे.

ठाण्यातील हवामान कसे आहे?
उन्हाळ्यात ठाण्यातील हवामान हे उष्ण-दमट स्वरुपाचे असते. तर हिवाळा हा सौम्य असून तेथे उष्णकटिबंधीय हवामान असते. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळा असतो. या चार महिन्यात शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतो.

मी ठाण्यात कसे पोहोचू शकतो?
उत्तर: ठाणे हे रेल्वे, महामार्ग आणि हवाईमार्गांनी भारताच्या विविध ठिकाणांशी जोडलेले आहे. ठाण्यापासून २५ किमी अंतरावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ठाण्यामध्ये रेल्वे स्टेशन देखील आहे. रेल्वेद्वारे ठाणे हे मुंबई व महाराष्ट्रातील अन्य भागांशी जोडले गेले आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांशी ठाणे शहर रस्त्यांद्वारे जोडले गेले असल्याने महामार्गाचा वापर करुन ठाण्याला जाता येते.

ठाण्यातील काही लोकप्रिय पर्यटन आकर्षणे कोणती आहेत?
उपवन तलाव, घोडबंदर किल्ला, मासुंदा तलाव (तलाव पाळी), केळवा चौपाटी, टिकुजीनी-वाडी, ओवळेकर वाडी, फुलपाखरु उद्यान आणि बावखळेश्वर मंदिर असे काही पर्यटन स्थळे ठाण्यामध्ये आहेत.

ठाण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
ठाण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. या चार महिन्यांमध्ये ठाण्यात हिवाळा असतो. आल्हाददायक हवामान असल्याने ही वेळ फिरण्यासाठी अनुकूल असते. जर तुम्हाला पाऊस आवडत असेल, तर तुम्ही जून ते सप्टेंबर या महिन्यांत ठाण्याला जाऊन पाऊस आणि हिरव्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

Read More
Thane district, schools are now tobacco free, health departments, students
ठाणे जिल्ह्यातील ९३६ शाळा तंबाखूमुक्त

विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट, गुटखा यांसारख्या पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामार्गत तंबाखू मुक्त शाळा हा उपक्रम राबविला आहे.

different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या ठाणे, पालघर यासांरख्या लोकसभा मतदार सघांतील जागावाटपाचे काय होणार याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली…

power play, eknath shinde, shiv sena, thane
ठाण्यात शिंदे सेनेचे महिला एकत्रिकरणातून शक्तिप्रदर्शन, रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार सखी महोत्सव

या मेळाव्याला ठाणे लोकसभा मतदार संघ क्षेत्रातील ५० हजाराहून अधिक महिला उपस्थित राहू शकतील, असे नियोजन शिंदेच्या सेनेकडून आखले जात…

boy tied to tree, boy beaten Temghar Pada,
ठाणे : १० वर्षीय मुलाला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण, आरोपींविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी येथील टेमघर पाडा भागात वाहनाचे नुकसान केल्याचा आरोप करत एका १० वर्षीय मुलाला घरातून बाहेर आणून त्याला पेरूच्या झाडाला…

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी

मुंबई महानगरातील शहरांच्या तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाच्या झळांमुळे नागरिकांच्या अंगाची काहीली होऊ लागली असून त्यापाठोपाठ आता उष्मघाताच्या त्रासामुळे…

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे यांच्यासह १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी ठाणे येथील…

heat in thane, thane district, heat still continue, murbad register highest temperature, 41 degree celsius,
तापमानात घट पण उकाडा कायम; मुरबाड सर्वाधिक ४१ अंशावर, जिल्ह्यात सरासरी तापमान ३९ अंशावर

गेल्या काही दिवसांपासून उकाडा सहन करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना गुरुवारी काही अंशी दिलासा मिळाला. गुरुवारी सरासरी तापमान बुधवारपेक्षा दोन ते…

rain Mumbai,
मुंबईसह ठाण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात बुधवारी तापमानात घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण…

traffic jam, Thane Belapur road, breaking of height barrier
हाईट बॅरियर तुटल्याने ठाणे बेलापूर मार्गावर मोठी कोंडी

गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास एका ट्रकने हाईट बॅरियरला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, संपूर्ण हाईट बॅरियर…

rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…

लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला असतानाच, ठाण्यात भाजप आमदार संजय  केळकर यांनी ठाकरे गटाचे उमदेवार राजन…

संबंधित बातम्या