scorecardresearch

ठाणे

ठाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोकण विभागामध्ये या जिल्ह्याचा समावेश होतो. ठाणे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या उत्तरेला वसलेले आहे. ठाणे शहरामध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. याच्याजवळच मुंबई महानगर प्रदेश (MMR)चा भाग देखील आहे.

ठाण्याचा उल्लेख तिसऱ्या शतकात मौर्य साम्राज्यामध्ये आढळतो. सातवाहन, चालुक्य, पोर्तुगीज यांच्यासह विविध राजवटींनी ठाण्यावर राज्य केले. आज ठाणे हे सुमारे १.८ दशलक्ष लोकांनी गजबजलेले शहर आहे.<br />
नौकाविहार आणि सहलीसाठी प्रसिद्ध असलेले उपवन तलाव हे ठाण्यातील प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय केळवा चौपाटी, येऊर हिल्स अशा ठिकाणीही लोक फिरायला जातात. सर्फिंग, वॉटर स्पॉर्ट्ससाठी केळवा चौपाटी प्रसिद्ध आहे. तर येऊर ही जागा तिच्या नैसर्गिक सौदर्यासाठी लोकप्रिय आहे.

हिंदू संस्कृती आणि मराठी सण हे ठाण्याची ओळख आहेत. येथे गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी आणि होळी असे सण जल्लोषात साजरे केले जातात.

ठाण्यामध्ये रस्ते, रेल्वे यांसह हवाई मार्गांचे जाळे आहे. यांच्यामार्फत हे शहर महाराष्ट्रातील अन्य शहरांशी जोडले गेले आहे. भारतातील प्रमुख ठिकाणांना जोडणारी उत्तम विकसित पायाभूत सुविधा ठाण्यामध्ये आहेत. ठाण्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या ठाणे कॅम्पससह अनेक शैक्षणिक संस्था आहेत. याशिवाय मोठमोठी अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेली रुग्णालयेही या शहरामध्ये आहेत. ठाणे हे आरोग्य सेवा केंद्रांचे घर बनले आहे.

सांस्कृतिक वारसा लाभलेला ठाणे हा जिल्हा नैसर्गिकरित्या समृद्ध आहे. विविध सुविधा आणि सेवा असलेले ठाणे शहर तेथील रहिवाश्यांसाठी अनुकूल आहे. पर्यटकांसाठीही ही जागा आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

ठाणे कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: उपवन किल्ला, घोडबंदर किल्ला यांसारखे ऐतिहासिक किल्ले; उपवन तलाव, ठाणे खाडी, मासुंदा तलाव (तलाव पाली) अशा ठिकाणांसाठी ठाणे प्रसिद्ध आहे.

ठाण्यातील हवामान कसे आहे?
उन्हाळ्यात ठाण्यातील हवामान हे उष्ण-दमट स्वरुपाचे असते. तर हिवाळा हा सौम्य असून तेथे उष्णकटिबंधीय हवामान असते. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळा असतो. या चार महिन्यात शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतो.

मी ठाण्यात कसे पोहोचू शकतो?
उत्तर: ठाणे हे रेल्वे, महामार्ग आणि हवाईमार्गांनी भारताच्या विविध ठिकाणांशी जोडलेले आहे. ठाण्यापासून २५ किमी अंतरावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ठाण्यामध्ये रेल्वे स्टेशन देखील आहे. रेल्वेद्वारे ठाणे हे मुंबई व महाराष्ट्रातील अन्य भागांशी जोडले गेले आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांशी ठाणे शहर रस्त्यांद्वारे जोडले गेले असल्याने महामार्गाचा वापर करुन ठाण्याला जाता येते.

ठाण्यातील काही लोकप्रिय पर्यटन आकर्षणे कोणती आहेत?
उपवन तलाव, घोडबंदर किल्ला, मासुंदा तलाव (तलाव पाळी), केळवा चौपाटी, टिकुजीनी-वाडी, ओवळेकर वाडी, फुलपाखरु उद्यान आणि बावखळेश्वर मंदिर असे काही पर्यटन स्थळे ठाण्यामध्ये आहेत.

ठाण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
ठाण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. या चार महिन्यांमध्ये ठाण्यात हिवाळा असतो. आल्हाददायक हवामान असल्याने ही वेळ फिरण्यासाठी अनुकूल असते. जर तुम्हाला पाऊस आवडत असेल, तर तुम्ही जून ते सप्टेंबर या महिन्यांत ठाण्याला जाऊन पाऊस आणि हिरव्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

Read More
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद

डोंबिवली पूर्व-पश्चिम भाग पादचारी पुलाने जोडणारा नेहरू रस्त्यावरील श्री गणेश मंदिराजवळील पादचारी पूल धोकादायक झाला आहे.

Campaigning of Rajan Vichare
ठाणे : राजन विचारे यांचा प्रचार सुरू

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार खासदार राजन विचारे यांनी शिवजयंती निमित्ताने गुरुवारपासून प्रचाराला शुभारंभ केला आहे.

bhiwandi lok sabha seat marathi news, badlapur congress leaders marathi news
“…तर सामूहिक राजीनामे देणार”, काँग्रेसचा इशारा; उमेदवार निश्चितीपूर्वीच महाविकास आघाडीत दुही

भिवंडी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र गेल्या काही निवडणुकीत इथे काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

ulhasnagar firing case marathi news, mla ganpat gaikwad marathi news
आमदार गणपत गायकवाड यांच्या फरार मुलाचा अंतरिम जामीन न्यायालयाने फेटाळला

आमदार गणपत गायकवाड अटक प्रकरणात इतर पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आमदार गायकवाड तळोजा कारागृहात आहेत.

ncp spokesperson anand paranjape marathi news, anand paranjape criticize mahavikas aghadi marathi news
“निवडणुकीआधीच महाविकास आघाडीचा डाव फिस्कटला”, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची टीका

विजय शिवतारे यांनी निवडणूक अर्ज दाखल केल्यास शिवसेना त्यांच्यावर कारवाई करेल आणि या कारवाईनंतर मग राष्ट्रवादी त्यांना उत्तर देईल, असेही…

Rajan Vikhares challenge to Shinde group in Thane search for a candidate in Kalyan continues
ठाण्यात राजन विचारे यांचे शिंदे गटासमोर आ‌व्हान, कल्याणमध्ये उमेदवाराचा शोध सुरूच

ठाणे लोकसभा मतदार संघातील उमेदवाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने कमालीची गुप्तता पाळली असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने या…

water crisis thane marathi news
ठाणेकरांना तुर्तास जलदिलासा, सध्या तरी पाणी कपातीचा निर्णय नाही

मुंबई आणि ठाणे शहरातील पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या भातसा धरणात जेमतेम ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Important junction roads on Ghodbunder route closed Some relief from congestion on main road
घोडबंदर मार्गावरील महत्त्वाचे छेद रस्ते बंद, मुख्य मार्गावरील कोंडीमध्ये काही प्रमाणात दिलासा

घोडबंदर मार्गावरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी येथील महत्त्वाच्या मानपाडा आणि कासारवडवली येथील सेवा रस्त्यातून मुख्य रस्त्याला जोडणारे छेद…

thane, Shiv Sena, Naresh Mhaske, Controversy, Wearing Slippers, Anand Dighe Photo, Kedar Dighe crirticise, uddhav thackarey shivsena, maharashtra politics, marathi news,
आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर शिंदे गटाचे नरेश म्हस्के चप्पल घालून? केदार दिघे यांचा घणाघाती आरोप

धुळवडीदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर चप्पल घालून होते असे छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले…

Terror of gangster with Koyta in Dombivli Gangster arrested by crime branch team
डोंबिवलीत कोयता घेऊन तडीपार गुंडाची दहशत, गुन्हे शाखेच्या पथकाकडून गुंड अटकेत

ठाणे जिल्ह्यातून अठरा महिन्यासाठी हद्दपार केलेल्या एका तडीपार गुंडाने सोमवारी रात्री डोंबिवली पू्र्वेतील इंदिरानगर भागात हातात कोयता घेऊन दहशत माजविली.

man attacked with axe for playing loud songs in holi
धुळवडीत मोठ्या आवाजात गाणी वाजविल्याने एकावर कुऱ्हाडीने हल्ला

धुळवड साजरी करण्यासाठी मोठ्या आवाजात गाणी वाजविल्याने एका तरूणावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

संबंधित बातम्या