PAK vs SL, World Cup 2023: शनिवार, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३च्या चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्लो ओव्हर-रेट राखल्याबद्दल श्रीलंकेला त्याच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ४२८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ ३२६ धावा करून सर्वबाद झाला.

एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनल ऑफ मॅच रेफ्रीचे सदस्य जवागल श्रीनाथ यांनी हा दंड ठोठावला. जेव्हा सामन्याची वेळ विचारात घेतली गेली तेव्हा असे निर्धारित केले गेले की, दासुन शनाकाच्या श्रीलंकेने आवश्यक वेळेपेक्षा दोन षटके कमी होती. आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार खेळाडू आणि खेळाडू सहाय्य कर्मचार्‍यांसाठी, जे किमान ओव्हर-रेटच्या गुन्ह्यांशी संबंधित आहे. खेळाडूंना प्रत्येक षटकासाठी त्यांच्या मॅच फीच्या ५ टक्के दंड आकारला जाईल कारण त्यांचा संघ षटके पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला. त्यामुळेच हा वेळ आणि दंड आकारला जातो आणि गेला आहे.

Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार
Virat Reveals Time Spent With Family
IPL 2024 : ‘लोक आम्हाला ओळखत नव्हते’, विराट कोहली दोन महिने कुठे होता? स्वत:च उघड केले गुपित

हेही वाचा: IND vs AUS, WC: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर विराटला मिळाले BCCIकडून खास मेडल, नदालप्रमाणे केले खास सेलिब्रेशन; पाहा video

दासुन शनाकाने गुन्हा कबूल केला आणि औपचारिक सुनावणीची गरज नाकारत प्रस्तावित शिक्षेला सहमती दिली. मैदानावरील अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ आणि शाहिद सैकत यांनी हे आरोप केले, त्यांना तिसरे अंपायर मायकेल गफ आणि चौथे अंपायर अॅलेक्स व्हार्फे यांनी मदत केली. सामन्याच्या सुरुवातीला, एडन मार्करामने चमकदार कामगिरी करून पुरुषांच्या ५० षटकांच्या विश्वचषक इतिहासातील सर्वात जलद शतकाची नोंद केली कारण शनिवारी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर १०२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. माजी चॅम्पियन श्रीलंकेने या चकमकीत विजयाची नोंद करण्यासाठी प्रयत्न केले परंतु कुसल मेंडिस (७६), चरित असालंका (७९) आणि दासुन शनाका (६८) यांच्या उल्लेखनीय योगदानानंतरही अखेरीस ४४.५ षटकांत ३२६ धावांवर बाद झाले.

एकदिवसीय विश्वचषक २०२३चा आठवा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात १० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. पाकिस्तानने पहिला सामना जिंकला होता तर श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा ८१ धावांनी पराभव केला. सौद शकीलला सामनावीर म्हणून निवडण्यात आले, त्याने ५२ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने ६८ धावांची तर मोहम्मद नवाजने ३९ धावांची चांगली खेळी केली. पाकिस्तानकडून हारिस रौफने ३ आणि हसन अलीने २ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा: IND vs AUS, WC: श्रेयस अय्यरच्या बेजबाबदार शॉटवर युवराज सिंग भडकला; म्हणाला, “अजूनही कळत नसेल तर के.एल. राहुलला…”

हा सामना कुठे पाहू शकता?

सामना क्रमांक: ८

संघ: पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका

स्थळ: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

वेळ: १० ऑक्टोबर दुपारी २ वाजल्यापासून (नाणेफेक दुपारी १:३० वाजता)

थेट प्रवाह: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्ने प्लस हॉटस्टार