आपल्या नजरेतली ‘ती’ एक जितंजागतं इन्स्टिटय़ूशन आहे, जे आपल्याला झूठं प्रेम आणि पवित्र प्रेम यातील फरक समजावतं. ‘ती’ आल्यावर आपली आधीची पापी नजर गंगाजल टाकल्यासारखी शुद्ध होते आणि मग बाकी मुलींना वखवखलेल्या नजरेनं पाहायचं होल्डवर टाकून देतो. इथे तिथे बसून हिच्यावर तिच्यावर असल्यातसल्या कमेन्ट पास करणं पाप वाटायला लागतं. आपण मग हळूहळू निरुपद्रवी गुड बॉय कॅटेगरीमध्ये जमा व्हायला लागतो..

नजर के सामने जिगर के पास रहनेवाल्या ‘तिच्याबद्दल’ ‘दिल लगा गधी से तो फिर परी क्या चीज है’ असं कुणी हिणवलं तर त्या श्वापदांना त्या क्षणी हत्तीच्या पायाखाली द्यावं किंवा उकळत्या तेलात तळावं किंवा मग गब्बर सिंगसारखं काचेच्या बाटल्या फोडून फोडून त्यावर नाचवायला लावावं अशा आणि यापेक्षा आणखी किती तरी वेगवेगळ्या खतरनाक शिक्षा द्याव्यात, असं मनात येतं आणि शंभरपैकी शंभर वेळेला ते शक्य नसल्यामुळं मनातच राहतं. असो. आताचा ‘थोडासा रुमानी हो जाये’ विषय आपल्या नजरेतल्या तिचाय्.

a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
mundu-clad gang boys dance on lungi shirt
Video : लुंगी शर्टवर तरुणांनी केला झकास डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल
youth was kidnapped
खळबळजनक..! मृतदेहाची इन्स्टाला स्टोरी (स्टेटस) ठेवली; ‘त्या’ तरुणाची अपहरण करून केली हत्या

तिचा विषयच असा की ‘ती’ आली की बरोबर जामानिमा घेऊन येते नजरेसमोर..

तिची ती गुलाबी कलरवाली लेडी बर्ड येते, तिचा तो, जाड भिंगाचा असं जरी लोक म्हणत असले तरी तिला गोड दिसणारा चष्मा येतो. मग नगदी दहा रुपये देऊन भरून आणलेल्या क्याशेटीतला समीर येतो, कधी उदित नारायण कधी कुमार सानू येतो आणि ‘जिये तो जिये कैसे बिन आपके’वाली ताउम्र अमर राहील असंच वाटवणारं फीलिंगपण!

तिला भले लोक जाडी, भदी, म्हैस काहीही म्हणोत आपल्या नजरेतून ती गुटगुटीत किंवा हेल्दीच दिसणार आणि तशीच ती राहील लाइफ टाइम. तिचे हलकेसे समोर आलेले दात लोकांना पुढे आलेले- फावडे वाटोत आपल्या नजरेत ते बन्नीटूथच. मग कधी ती कुणाकडे बघून हसली (बाबा, भाऊ , चुलत भाऊ  सोडून) तर प्रचंड राग येतो. कुणाशी बोलली तर बोलणाऱ्याला उलटा टांगून मिरचीची धुरी द्यावीशी वाटते आणि समजा आपल्याच सारखं दूर थांबून कुणी उगीच पाहिलं तर ‘तुम्हें कोई और देखे तो जलता है दिल, बडी मुश्किलों से फिर संभलता है दिल’ आणि थोडक्यात आपल्या मनाची अवस्था ‘न दिन को चैन है शाफिर, ना रात को सुकून है ’ अशीच. हो हे जरा फिल्मीच आहे पण आपलं तिच्याबद्दलचं कंडिशनिंग झालंच तसं आहे. आपल्या नजरेतून ‘ती’ जेव्हा जेव्हा दिसते ती अशीच दिसते. ‘लार्जर दॅन लाइफ’ फुल्ल ७० एमएम!  ‘मोहोब्बतें’चा म्युझिक ट्रॅक बॅकग्राउंडला वाजतो अन् हवा सुटून पिंपळाची पानं उडायला लागतात. मग पाण्याच्या टाकीवर, दळण आणताना, टय़ुशनमध्ये, कॉलेजमध्ये आधी कुठंही असं बऱ्याच वेळेला दिसलेली किंवा आत्ता पहिल्यांदा बघितलेली ‘ती’ नजरेतून दिल में उतरते आणि आपला ‘सुपरमॅन’ होतो. हो, आपल्याला तिच्याबद्दलची जी ‘नजर’ मिळाली आहे, ती अशीच मिळालीय ‘ती’ म्हणजे कुणी तरी नासा अन् आपण तिच्यात बुडलेला ‘प्रेम का प्यासा’.  १८,१९,२० रिळांमध्ये यशस्वी झालेल्या सिनेमातील प्रयोगांना रिअलमधल्या इन्फिनिटी रिळामध्ये करून, पडताळून पाहायचे. तिच्यासाठी दिलाचा बंद लिफाफा खून से लिखे लेटर के साथ आणि एक आर्जव, ओ बेबी डोन्ट ब्रेक माय हार्ट. बस! नथिंग एल्स.

ती हसली की तिचे दात माधुरीसारखे दिसतात, तिची खळी जुहीसारखी, फिगर ऐश्वर्यासारखी, बोलणं काजोलसारखं, आवाज थोडासा घोगराय् राणी मुखर्जीसारखा इत्यादी इत्यादी थोडक्यात आपल्या नजरेतल्या ‘ती’मध्ये कोलाज आहे, आपल्याला जे जे आवडतं त्याचा. आणि नसेल तरी आपण ठरवलंय आता जी आपल्याला आवडलीय तिच्यात हे सगळं आवडतं चांगलं कुटून कुटून भरलंय कदाचित हे इतकं बारीक कुटलंय की बाकीच्यांना ते दिसत नाही म्हणूनच ते कमजर्फ (नीच)आपल्याला बघितलं की आपापसात ‘प्यार में अंधा- लव्ह इज ब्लाइंड? म्हणत एकमेकांना टाळ्या देतात.. खुशाल देवोत. आपण वेगळ्याच धुंदीत.. इजहारे मुहोब्बत कसं बोलायचं?

आपली लखते जिगर, सच्ची मुहब्बत, कायनात, जिने की राह, एक तू ही जन्नत, कत्थइ आँखोवाली असलेल्या ‘तिला’ बोलणं दिल का राज खोलना हे इतकं सोपं नाही की गेलात तिला थांबवून मौसमच्या गोष्टी केल्यात अन् मग मुद्दय़ाचं बोलून झालं. अरे ती ‘आम’ थोडी ना आहे, असं करायला तिला ते आपल्या डोळ्यांतून कळलं पाहिजे. आपल्या दिलाची धडकन तिला आपोआप ऐकू जायला पाहिजे. आपण कॉन्फिडन्ट, ती जाईलंच. वक्त, दुनिया, तो उपरवाला पण डोळे फाडून बघेल मग तो ‘पल’. आपण दर्या ती साहिल.

आपल्या नजरेतली ‘ती’ म्हणजे ‘जैसे शायर का ख्वाब’ अन ‘मंदिर में हो एक जलता दिया’ आहे आणि तिच्यासाठी आपलं फीलिंग म्हणजे ‘दिल जिगर नजर क्या हैं’ आपण तर तुझ्यासाठी जानही देऊ  अशीच आणि बदल्यात आपल्याला कै म्हणजे कै नै पाहिजे फार फार तर छोटासा किस, तो पण तिची इच्छा असेल तरंच. नै तो फक्त पवित्र प्रेम चलेगा. आपली तिच्याकडून फक्त एकच मांग ‘मांग भरू दे’. तिच्या आई-वडिलांनी गप्प गुणांनी हाथ पिवळे दिले तर भारी, नैतर ती एकदा ‘हो’ म्हणाली की तिच्या प्रेमाची ताकद आपल्याला पर्बतो से टकरांने की शक्ती देईलच मग तिच्या आपल्या घरचे किस झाड की पत्ती. शनिवार के शनिवार मारुतीसमोर मन्नत का तेल अन् अगरबत्ती!

आपल्या नजरेतली ‘ती’ एक जितंजागतं इन्स्टिटय़ूशन आहे, जे आपल्याला झूठं प्रेम आणि पवित्र प्रेम यातील फरक समजावतं ‘फिजिकल’ हा शब्दसुद्धा आपण इथं ५०० मीटरपेक्षा किती तरी लांब म्हणजे लग्नानंतरच असं ठरवून येतो. ‘ती’ आल्यावर आपली आधीची पापी नजर गंगाजल टाकल्यासारखी शुद्ध होते. आपण मग बाकी मुलींना वखवखलेल्या नजरेनं पाहायचं होल्डवर टाकून देतो. इथे तिथे बसून हिच्यावर तिच्यावर असल्यातसल्या कमेन्ट पास करणं पाप वाटायला लागतं. आपण मग हळूहळू निरुपद्रवी गुड बॉय कॅटेगरीमध्ये जमा व्हायला लागतो.

‘प्रेम कर भिल्लासारखं बाणावर खोचलेलं, मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोहचलेलं’ ही आणि अशा कविता अभ्यासक्रमाचा भाग असो नसो पाठ व्हायला लागतात. ‘इश्क इक आग का दरिया है और डूब के जाना है’ सारखे उर्दू शेर, गजला, इब्ने इन्शा, गुलाम अली, जगजीत सिंग यांचा परिचय होऊन मग त्यांच्यात नकळत रुची वाढू लागते. बोलण्यात, लिहण्यात मग ईत्तेदा, इंतजार, वफा, जफा, जुस्तजूसारखे शब्द वारंवार येऊ  लागतात, थोडक्यात आपली शब्दसंपत्ती वाढायला सुरुवात होते.

इंग्लिश ही युनिव्हर्सल आणि इम्प्रेस करणारी भाषा असल्याकारणाने आपण मग जिथे कुठे बसू हातात इंग्लिश पेपर घ्यायला लागतो आणि मग साहजिकच तिच्याबद्दलचा (इंग्लिश) गंड काही अंशी कमी झाल्यासारखा वाटतो आणि काही जणांच्या बाबतीत तो होतोही.

‘ती’ कॉलेजात नियमित येत असल्याकारणाने आपलंसुद्धा कॉलेज बुडवणं बंद होतं. तिची जबाबदारी आपण स्वत:हून तिला न विचारता घेतल्यानं आपण एकाएकी जबाबदार व्यक्ती असल्यासारखं वागायला लागतो आपण मग करिअरबद्दल जागरूक होऊन जात असल्याचे दाखले मिळतात.

आपल्या नजरेत बसलेल्या ‘तिच्या’ नजरेतल्या आपल्याला अधोरेखित करण्यासाठी आपण सतराशे साठ उद्योग करतो आणि संस्कृत मधूनसुद्धा सिद्ध करतो ‘उद्योगम् पुरुषलक्षणम्’.

थोडक्यात काय तर ‘ती’ येते (आपल्याकडे नाही) ‘ती’ पाहते (आपल्याला नाही) आणि आपण ‘ती’चे होतो (तिच्या नकळत) बाकी सगळं तीन फुल्या तीन बदाम तेच तेच कवितेतल्यासारखं तुमचं आमचं सेम वगैरे वगैरे.

प्रसाद कुमठेकर

prasadkumthekar1@gmail.com