आपल्याकडे घरात अनेक बंद पडलेले फोन असतात. जे चालू होतं नाहीत किंवा त्यांच्यावर खूप जास्त खर्च करण्याची गरज असते. त्यामुळे आपण त्यावर खर्च न करता नवीन फोन घेतो आणि बंद पडलेला फोन तसाच घरात पडून राहतो. हे बंद पडलेले फोन एक्ससेंज करता देखील येत नाहीत. कारण त्यांचा काहीही उपयोग नसतो. पण जर तुम्हाला सांगितल, की जुन्या फोनच्या बदल्यात तुम्हाला २००० रुपये मिळतील तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?

होय, घरात बंद पडलेला तुमचा जुना मोबाईल फोन सुद्धा तुम्हाला २ हजार रुपयांचा पूर्ण फायदा मिळवू शकतो. सामान्यतः, जेव्हा तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करता तेव्हा एक्सचेंज ऑफर अंतर्गत, तुम्हाला योग्यरित्या चालणारा स्मार्टफोन द्यावा लागतो. एक्सचेंजमध्ये दिलेला मोबाईल फोन चांगल्या स्थितीत नसला तरी तो नाकारला जातो आणि तुम्हाला पैशांचा लाभ मिळत नाही. पण मुकेश अंबानी आणि रिलायन्स जिओने अशी एक उत्तम योजना आणली आहे, ज्या अंतर्गत बंद झालेला जुना मोबाईल देखील तुम्हाला २००० रुपयांचा पूर्ण फायदा मिळवू शकतो. पुढे आम्ही या ऑफरची संपूर्ण माहिती दिली आहे.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
How to Make Home Made Instant Chilli Rice Dhokla with Leftover Rice Not The Tasty And Quick Recipe
रात्री उरलेल्या भाताचे काय करायचं असा प्रश्न पडलाय ? मग ‘हा’ पदार्थ बनवून पाहा; झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा
Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार
Mystery of dead body found in quarry solved revealed to have been murdered by a friend
दगडखाणीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, मित्राने हत्या केल्याचे उघड

(हे ही वाचा: २४ ऑक्टोबरपासून ‘या’ स्मार्टफोनमध्ये बंद होईल WhatsApp सपोर्ट; पूर्ण लिस्ट येथे पाहा)

जुन्या लॉक केलेल्या फोनवर २००० रुपयांचा फायदा

रिलायन्स जिओच्या या नवीन ऑफरचा फायदा जिओ फोन नेक्स्टवर उपलब्ध आहे. कंपनीने या ४जी स्मार्टफोनवर एक नवीन एक्सचेंज ऑफर सुरू केली आहे, ज्या अंतर्गत Jio Phone Next खरेदी करताना तुमचा जुना मोबाइल फोन बदल्यात दिल्यास तुम्हाला थेट २००० रुपयांची सूट मिळेल. जिओची ही ऑफर इतर एक्सचेंज ऑफरपेक्षा वेगळी आणि खास आहे कारण यामध्ये कोणताही व्यक्ती त्याचा कोणताही मोबाईल फोन बदल्यात देऊ शकतो.

जर एखादी व्यक्ती आपल्या घरात पडलेला जुना स्मार्टफोन घेऊन येत असेल, तर कंपनीच्या पॉलिसीनुसार त्याला २००० रुपयांचा फायदाही दिला जाईल. म्हणजेच जंकमध्ये पडून असलेला मोबाईल फोन Jio Phone Next च्या खरेदीवर २ हजार रुपयांचा फायदाही देत ​​आहे.

( हे ही वाचा: आता iPhone १३ सर्वात कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी; Flipkart-Amazon सेलमध्ये पहिल्यांदा आली अशी भन्नाट ऑफर, जाणून घ्या)

Jio Phone Next

Jio आणि Google ने मिळून बनवलेल्या सर्वात स्वस्त ४जी स्मार्टफोनची भारतीय आतुरतेने वाट पाहत होते. परंतु अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा रिलायन्स जिओने आपला जिओ फोन नेक्स्ट आणला तेव्हा मोबाईल वापरकर्त्यांची निराशा झाली. खरंतर लोकांना या फोनकडून खूप अपेक्षा होत्या कारण अंबानींनी हा जगातील सर्वात ४जी स्मार्टफोन असल्याचा दावा केला होता. पण कंपनीने Jio Phone Next ला ६४९९ रुपयांच्या किमतीत लाँच केले, जे सामान्य माणसाच्या अपेक्षेपेक्षा जास्त महाग होते. पण आता हा JioPhone फक्त ४९९९ रुपयांना २००० रुपयांच्या सवलतीसह विक्रीसाठी जात आहे.