40 Crore Twitter Users Data Sale : अलीकडे हॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचा डेटा हॅक झाल्याचे समोर आले होते. आता नव्या अहवालानुसार, हॅकरने ट्विटरच्या ४० कोटी युजर्सचा खासगी डेटा चोरी केला आहे. यामध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांचाही समावेश असल्याचे म्हटले आहे. सर्व खासगी डेटा डार्कवेबवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

इस्रायलची सायबर इंटेलिजेन्स कंपनी हुडसन रॉकच्या अहवालानुसार, विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या डेटामध्ये ईमेल, नाव, युजरनेम, फॉलोवर्स आणि काही प्रकरणांमध्ये फोन नंबरचा समावेश आहे. ट्विटर युजर्सचा डेटा मिळवण्याची ही पहिली वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी ५.४ दशलक्ष ट्विटर युजर्सचा डेटा लीक झाला होता. मात्र, यंदाचा डेटा लीक सर्वात मोठा आहे.

Mephedrone Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन, आरोपीला अटक
Anant Ambani and Radhika Marchant pri Wedding
Video : जामनगरमध्ये व्हीआयपी पाहुण्यांसाठी अंबानी कुटुंबाने उभारले आलिशान तंबू, आतील सोयी बघून तुम्हीही व्हाल थक्क
how much Rihanna charges to perform at a private event (1)
रिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये करणार परफॉर्म
Bharat Electronics Limited Trainee Engineer 517 vacancies Last Day 13 March
BEL Trainee Bharti 2024: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनिअरच्या ५१७ पदांसाठी भरती! ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज

(Promotional Calls, एसएमएसमुळे त्रासले? बंद करण्यासाठी अ‍ॅक्टिव्हेट करा DND, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)

अज्ञान हॅकरने डेटाचा नमुना हॅकर फॉरमवर पोस्ट केला आहे. नमुना डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवलेले तपशील दर्शवतो. लिकमध्ये काही हाय प्रोफाइल खात्यांची माहिती असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये पुढील खात्यांचा समावेश आहे.

  • अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझ
  • सीबीएस मीडिया
  • डोनाल्ड ट्रंप जेआर.
  • स्पेस एक्स
  • चार्ली पुथ
  • डोजा कॅट
  • सुंदर पिचाई
  • सलमान खान
  • एनबीए
  • माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत

यासह इतर काही हाई प्रोफाइल खात्यांचा समावेश आहे. एपीआय असुरक्षिततेमुळे हॅकर करोडो ट्विटर युजर्सच्या वैयक्तिक तपशील मिळवू शकला असावा, असे हुडसन रॉकचे म्हणणे आहे. बगमुळे हॅकरला युजरची खासगी माहिती जसे, ईमेल आयडी आणि फोन नंबर मिळाले असेल, अशी शंका हुडसन रॉकने व्यक्त केली आहे.

(२५ हजारांच्या आत मिळतंय 40 Inch Smart Tv, इअर एन्ड सेलमधील या Best deals करतील मोठी बचत)

हुडसन रॉकने डार्कवेबवरील हॅकरच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात हॅकरने इलॉन मस्क यांना हा डेटा खरीदी करण्याचे आवाहन केले आहे. मध्यस्थीमार्फत डीलसाठी तयार असून त्यानंतर डेटा डिलीट करणार आणि तो पुन्हा कोणाला विकणार नाही, असे त्यात लिहिले आहे. डेटा कुणालाही विक्री होणार नाही ज्यामुळे सेलिब्रिटी, राजकारण्यांचा फिशिंग, क्रिप्टो स्कॅम, सिम स्वॅपिंग, डॉक्सिंगपासून बचाव होईल, असे सांगण्यात आले आहे. सध्या ट्विटर किंवा इलॉन मस्क दोघांनीही डेटा लीकची पुष्टी केलेली नाही.