एकीकडे AI मुळे अनेकांना आपली कामं करणं सोपं होत आहे, तर दुसरीकडे याच तंत्रज्ञानामुळे काही लोकांना फसवणुकीचा सामना करावा लागत आहे. कारण अनेक हॅकर्स किंवा स्कॅमर लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी, लोकांची फसवणूक करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याची उदाहरणं समोर येत आहेत. काही दिवसांपुर्वी बनावट एआय कॉलमुळे हॅकर्स अनेकांची फसवणूक करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये हॅकर्सनी एका व्यक्तीची AI कॉलद्वारे तब्बल ५ कोटींची फसवणूक केली आहे.

अशी केली फसवणूक –

Vodafone Idea (VIL) , FPO, public investors
‘व्होडा-आयडिया’ची सुकाणू गुंतवणूकदारांकडून ५,४०० कोटींची निधी उभारणी, आजपासून प्रत्येकी १०-११ रुपयांनी समभाग विक्री
IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश
The Shapoorji Palanji Group on Tuesday announced the sale of Gopalpur Port in Odisha to Adani Ports and SEZ for Rs 3350 crore
अदानीं’च्या बंदर-सत्तेचा विस्तार; एसपी समूहाकडून गोपाळपूर बंदराची ३,३५० कोटींना खरेदी

चीनमधील एका व्यक्तीला बनावट AI व्हिडीओ कॉल खूप महागात पडला आहे. कारण त्याची जवळपास ५ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. हॅकर्सने एआय पॉवर्ड फेस स्वॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर केला. हॅकर्सने यावेळी ज्याची फसवणूक करायची आहे, त्या माणसाच्या ओळखीच्या व्यक्तीचा चेहरा स्क्रीनवर लावला आणि स्वतःला त्याचा मित्र असल्याचं सांगितलं. कॉल सुरू असताना हॅकर्सने त्या व्यक्तीला फसवले आणि त्याच्या खात्यातील ५ कोटी रुपये स्वत:च्या खात्यामध्यये ट्रान्सफर करायला सांगितले.

हेही वाचा- ग्राहकांपर्यंत Damage Products पोहचू नये यासाठी Amazon ने लढवली शक्कल; प्रोडक्ट्स टेस्टिंगसाठी घेणार AI ची मदत

दरम्यान घटनेतील व्यक्तीने त्याच्या मित्राला याबाबत विचारले असता, मित्राने आपण असा कोणताही कॉल केल्याचं किंवा पैसे मागितलं नसल्याचं सांगितलं. त्यामुळे पीडित व्यक्तीने लगेच पोलीसांशी संपर्क केला आणि या प्रकरणाची माहिती दिली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून काही पैसे देखील मागे घेण्यात आले आहेत. तर ही घटना चीनच्या बाओटौ येथे घडली आहे. सध्या या फसवणूकीच्या घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. शिवाय अशा फसवणुकीपासून स्वत:चा बचाव कसा करायचा? याबाबतच्या काही टिप्स आहेत, त्या जाणून घेऊया.

बनावट व्हिडीओ कॉल कसा ओळखायचा?

हेही पाहा- अपघातामुळे रुळावरुन घसरलेली रेल्वे पुन्हा रुळावर कशी नेली जाते? पाहा Video

व्हिडिओ गुणवत्ता (Video Quality) –

जेव्हा एखादी व्यक्ती AI च्या मदतीने किंवा फसवणुकीच्या उद्धेशाने व्हिडीओ कॉल करतो किंवा बनावट व्हिडिओ कॉल करतो, तेव्हा व्हिडीओची गुणवत्ता सामान्य कॉलच्या सारखी राहणार नाही. म्हणूनच व्हिडीओ गुणवत्ता तपासा आणि पार्श्वभूमी आणि आवाज देखील समजून घ्या.

संपर्क पडताळणी (contact verification) –

तुम्हाला कोणत्या प्लॅटफॉर्मवरून आणि कोणत्या नंबरवरून व्हिडीओकॉल येत आहे हे तपासा. जर तुम्हाला माहिती नसेलेल्या नंबरवरुन फोन येत असेल तर तो उचलू नका, शिवाय लगेच त्या नंबरला रिपोर्ट करा. जर तुम्ही कॉल उचलला तर कोणतेही वैयक्तिक तपशील शेअर करू नका किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

तसेच AI बनावट व्हिडीओ कॉलपासून बचाव करणं सोपे आहे. फक्त यासाठी तुम्हाला सतर्क राहून इंटरनेट वापरावे लागेल. व्हिडिओची गुणवत्ता, फ्रेम, आवाज इत्यादींवरून तुम्हाला तो खोटा आहे की खरा हे ओळखता येतं.