मागील काही दिवसात भारतीय बाजारपेठेत रिअलमीच्या फ्लॅगशिपचा फोन Realme GT NEO 2 लोकांच्या पसंतीस उताराला आहे. ऑक्टोबर २०२१मध्ये ३१,९९९ या किमतीमध्ये हा फोन लॉंच करण्यात आला होता. जर तुम्हालाही हा फोन विकत घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे, कारण तुम्हाला हा फोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत मिळू शकतो, जो तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. या फोनवर ९ हजार रुपये इतकी सूट दिली जात आहे. हा फोन उत्कृष्ट ६४ मेगापिक्सेल कॅमेरा आणि ५००० एमएएच बॅटरीसह येतो.
काही बँक ऑफर वापरून तुम्ही रिअलमी जीटी निओ २, २२,९९९ रुपयांत फ्लिपकार्टद्वारे खरेदी करू शकता, जो आतापर्यंतचा सर्वात कमी दर आहे. रिअलमी जीटी निओ २, भारतात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी अंतर्गत स्टोरेज व्हेरिएंटसाठी ३१,९९९ रुपयांपासून लॉंच करण्यात आला होता. यामध्ये स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर, ६४ मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि १२०Hz, एचडीआर १०+ एमोएलईडी डिस्प्ले यांसारख्या गोष्टी देण्यात आल्या आहेत.




तुमच्या फोनचा बॅटरी बॅकअप खराब झालाय? सारखा चार्ज करावा लागत असेल तर जाणून घ्या ‘या’ टिप्स
९ हजार रुपयांच्या सवलतीसह हा फोन खरेदी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम कोणत्याही बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरावे लागेल, ज्यावर तुम्हाला ६,००० रुपयांपर्यंत झटपट सूट दिली जाईल. त्यानंतर फोनची किंमत २५,९९९ रुपयांपर्यंत खाली येईल. जर तुम्ही व्यवहारासाठी एचडीएफसी क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही किंमत अतिरिक्त ३ हजार रुपयांनी कमी होऊ शकते. जर या दोन्ही ऑफर लागू असतील तर तुम्हाला हा फोन ९ हजारांच्या डिस्काउंटसह मिळू शकेल. ही ऑफर फक्त ८जीबी + १२८जीबी व्हेरियंटसाठी उपलब्ध आहे.
फ्लिपकार्टवर ही ऑफर केवळ २८ फेब्रुवारीपर्यंतच उपलब्ध असेल. या फोनची तुलना शाओमीच्या एमआय ११एक्स (Xiaomi Mi 11X) आणि iQOO 7 सोबत केली जाते. या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये ६.६२ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्लेसोबत ६४ मेगापिक्सेल, ८ मेगापिक्सेल आणि २ मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप आहे. तसेच १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर आहे.