मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करण्यापासून ते प्रथमच मतदारांची नावनोंदणी सुलभ करण्यापर्यंत, मंत्रिमंडळाने बुधवारी काही महत्त्वाच्या निवडणूक सुधारणांना मंजुरी दिली. निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाला दिलेल्या अनेक सूचनांमध्ये एकच मतदार यादी आणि दूरस्थ मतदान या सुधारणांचाही समावेश आहे. नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल, एसएमएस किंवा फोनद्वारे बूथ-लेव्हल अधिकाऱ्यांना भेट देऊन मतदार ओळखपत्रांशी आधार लिंक करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिंक करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

https://voterportal.eci.gov.in/ ला भेट द्या.

तुमचा मोबाईल क्रमांक/ईमेल आयडी/मतदार आयडी क्रमांक वापरून लॉगिन करा.

( हे ही वाचा: व्होटर कार्डला ‘आधार’ची जोड; बोगस मतदान रोखण्यासाठी मोदी सरकारचा निर्णय )

पासवर्ड टाका.

तुमचे राज्य, जिल्हा तपासा.

तुमचे वैयक्तिक तपशील जसे की नाव, जन्मतारीख आणि वडिलांचे नाव सबमिट करा.

‘सर्च’ बटणावर टॅप करा.

( हे ही वाचा: Jio-Airtel-Vi चे १०० रुपयांच्या आतील ‘हे’ आहेत रिचार्ज प्लॅन्स; जाणून घ्या संपूर्ण तपशील )

तुमचा तपशील सरकारी डेटाबेसशी जुळल्यास तुमचे तपशील स्क्रीनवर दिसतील.

स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिसणार्‍या ‘Feed Aadhaar No’ पर्यायावर टॅप करा.

एक पॉप-अप पृष्ठ दिसेल जिथे तुम्हाला आधार कार्ड, आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि/किंवा नोंदणीकृत ईमेल पत्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे तुमचे नाव भरावे लागेल.

( हे ही वाचा: १८ वर्षांनंतर राहू मेष राशीत करेल प्रवेश , ‘या’ ४ राशीच्या लोकांच्या जीवनात आणेल आनंद आणि समृद्धी )

‘सबमिट’ बटण दाबा.

तुमचा अर्ज यशस्वीरित्या नोंदणीकृत झाल्याचा संदेश तुम्हाला मिळेल.

मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करणे अनिवार्य आहे का?

नाही, हे अनिवार्य नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadhaar voter id linking how to link aadhaar to voter card know the steps ttg
First published on: 16-12-2021 at 13:55 IST