scorecardresearch

स्मार्टवॉच डेटानुसार करोना बुस्टर डोस हृदयासाठी सुरक्षित; लॅन्सेटमध्ये प्रकाशित अभ्यासाचा निष्कर्ष

स्मार्टवॉच डेटानुसार करोना बुस्टर डोस हृदयासाठी सुरक्षित आहे असा अभ्यास लॅन्सेटमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे

स्मार्टवॉच डेटानुसार करोना बुस्टर डोस हृदयासाठी सुरक्षित; लॅन्सेटमध्ये प्रकाशित अभ्यासाचा निष्कर्ष
स्मार्टवॉच डेटानुसार करोना बुस्टर डोस हृदयासाठी सुरक्षित (फोटो: प्रातिनिधिक, Reuters)

करोनाचा बुस्टर डोस हृदयासाठी सुरक्षित आहे, असे लॅन्सेटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासात नमुद करण्यात आले आहे. स्मार्टवॉचद्वारे या अभ्यासाचा डेटा गोळा करण्यात आला होता.

टेल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सुमारे ५००० इस्रायली व्यक्तींवर हे संशोधन केले. या व्यक्तींच्या शारीरिक स्थितीचे निरीक्षण स्मार्टवॉचद्वारे करण्यात आले. या निरीक्षणाचा कालावधी २ वर्ष होता.

यापैकी २०३८ जणांनी करोनाचा बुस्टर डोस घेतला. बुस्टर डोस घेण्याआधी आणि बुस्टर डोस घेतल्यानंतर या व्यक्तींच्या शारीरिक स्थितीमध्ये काय बदल झाला याचा संशोधकांनी अभ्यास केला. यावरुन बुस्टर डोस सुरक्षित आहे की नाही याचा निष्कर्ष काढण्यात आला.

या अभ्यासादरम्यान असे आढळून आले की बुस्टर डोस घेतल्यानंतर अनेकांना २ ते ३ दिवस थकवा, डोकेदुखी असा त्रास होत होता. पण नंतर हा त्रास कमी झाला. लसीकरणाच्या आधीच्या स्थितीपेक्षा हार्ट रेट लसीकरणानंतर जास्त असल्याचे आढळले. पण ६ दिवसानंतर ते सामान्य स्थितीत आले. त्यामुळे बुस्टर डोस हृदयासाठी सुरक्षित असल्याचा निष्कर्ष या अभ्यासात नोंदवण्यात आला.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 11:45 IST

संबंधित बातम्या