scorecardresearch

Reliance Jio आणि Airtel साठी खुशखबर, तर Vodafone- Idea ला बसला मोठा झटका; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Reliance Jio , Vodafone-Idea आणि Airtel या देशातील सर्वात लोकप्रिय अशा टेलिकॉम कंपन्या आहेत.

Reliance jio- Bharati Airtel- Vodafone Idea subscribers hnews
Reliance jio- Bharati Airtel- Vodafone Idea – संग्रहित छायाचित्र / द इंडियन एक्सप्रेस

Reliance Jio , Vodafone-Idea आणि Airtel या देशातील सर्वात लोकप्रिय अशा टेलिकॉम कंपन्या आहेत. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन या कंपन्या लाँच करत असतात. आता देशात ५जी नेटवर्क देखील सुरु झाले आहे. देशातील या कंपन्यांपैकी रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल यांनी संयुक्तपणे नोव्हेंबर २०२३ मध्ये २५ लाख मोबाईल ग्राहक जोडले आहेत. तर आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या वोडाफोन आयडियाने सुमारे १८. ३ लाख ग्राहक गमावले आहेत. रिलायन्स जिओने १४.२६ लाख नवीन ग्राहक जोडून आपली स्थिती मजबूत केली तर एअरटेलने देखील १०.५६ लाख नवीन ग्राहक जोडले आहेत.

ट्रायच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस जीओचे सुमारे ४२२.८ दशलक्ष मोबाईल ग्राहक होते. मागील महिण्यात हा आकडा ४२.१३ क्कॉती इतका होता. भारती एअरटेलच्या ग्राहकांची संख्या आता ३६.६० कोटी झाली आहे. नुकसानीत असलेल्या वोडाफोन आयडियाचे १८.२७ लाख ग्राहक मी झाले आहेत. त्यांच्या ग्राहकांची संख्या ही २४.३७ कोटींवर आली आहे. रिलायन्स जिओने सहा वर्षांपूर्वी टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर शुल्क कमी करण्याची स्पर्धा सुरु केली. त्यामुळे इतर दूरसंचार कंपन्यांनाही त्याच्या प्लॅनच्या किंमती कमी कराव्या लागल्या.

हेही वाचा : Jio Recharge Plan: दिवसभर Instagram Reels बघायचेत, जिओने आणले ‘हे’ सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन

नोव्हेंबरमध्ये एकूण ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या ८२.५३ कोटी इतकी झाली आहे. पाच दूरसंचार सेवा कंपन्यांचा बाजारातील हिस्सा ९८ टक्क्यांपेक्षा जास्त होता. यात रिलायन्स जिओ( सुमारे ४३ कोटी), भारती एअरटेल (सुमारे २३ कोटी) आणि वोडाफोन आयडिया (सुमारे १२.३ कोटी) तर बीएसएनएलचे (२.६ कोटी) इतका समावेश होता.

सर्वात मोठी दुसरी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने सात क्षेत्रामध्ये १५५ रुपयांचा नवीन प्लॅन लाँच केला आहे. त्यामुळे त्य्नाच्या सर्वात स्वस्त प्लॅनच्या दरामध्ये ५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही स्कीम सध्या कर्नाटक, बिहार आणि राजस्थानसह सात प्रदेशांसाठी आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 15:59 IST