आजच्या काळात आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आज कोणतेही सरकारी काम असो की खाजगी, प्रत्येकाला आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, फोटो, जन्मतारीख इत्यादी सर्व माहिती असते. काहीवेळा आपल्याला आधारमध्ये आपला पत्ता अपडेट किंवा बदलण्याची आवश्यकता असते. या प्रकरणात आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही ते घरी बसून ऑनलाइन करू शकता. तुम्ही ते कसे कराल जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधारमधील पत्ता घरबसल्या अपडेट केला जाईल आधारमध्ये पत्ता ऑनलाइन अपडेट करण्यासाठी तुम्हाला फक्त ५० रुपये शुल्क भरावे लागेल. तुम्ही UIDAI संकेतस्थळाला भेट देऊन तुमचा पत्ता बदलू शकता. त्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घेऊया.

असे करा अपडेट

  • तुमचा पत्ता ऑनलाइन बदलण्यासाठी, तुम्हाला प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट myaadhaar.uidai.gov.in/ वर जावे लागेल. तेथे लॉग इन करण्यासाठी, तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि Send OTP वर क्लिक करा.

(हे ही वाचा : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? जाणून घ्या ‘या’ सोप्या पद्धतीने… )

  • दुसऱ्या स्टेपमध्ये तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. ते प्रविष्ट करा आणि लॉग इन करा. त्यानंतर तुम्हाला वरच्या मेनूमधील आधार अपडेट पर्यायावर जावे लागेल. यानंतर Proceed to Aadhaar अपडेट या पर्यायावर क्लिक करा.
  • तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला पुढील पेजवर पत्ता निवडावा लागेल आणि Proceed to Aadhaar अपडेट या पर्यायावर क्लिक करावे लागेल. असे केल्याने तुमचा वर्तमान पत्ता स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला अपडेट करायचा असलेल्या पत्त्याचा पर्याय येईल. नवीन पत्त्याचा तपशील भरावा लागेल.
  • चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला कागदपत्र सबमिट करावे लागेल, ज्यामध्ये तुमचा नवीन पत्ता असेल. त्यानंतर तुम्हाला खालील दोन्ही चेक बॉक्सवर क्लिक करावे लागेल आणि Nest वर क्लिक करावे लागेल. पेमेंटचा पर्याय तुमच्या समोर येईल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार UPI नेट बँकिंग किंवा कार्डद्वारे पेमेंट करू शकता. पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला पावती मिळेल. यानंतर तुमचा आधार दोन दिवसात अपडेट होईल.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Address in aadhaar card can now be updated at home pdb
First published on: 23-09-2022 at 10:12 IST