Facebook Messenger Stickers: मागील काही महिन्यांपासून आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्राचा वापर वाढल्याचे पाहायला मिळते. अनेक मोठमोठ्या कंपन्या AI चा समावेश आपल्या कामामध्ये करत आहेत. मेटाने देखील या तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली आहे. मेटाच्या फेसबुक मेसेंजर या अॅपमध्ये यूजर्संना चॅटजीपीटी स्टाईल प्रॉम्प्टचा वापर करुन स्टिकर्स बनवणे शक्य होणार आहे. याव्यतिरिक्त मेटा कंपनी;च्या इतर प्रकल्पांमध्येही AI Tech पाहायला मिळणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. The Verge ने दिलेल्या माहितीनुसार, मेटाच्या AI विभागाचे उपाध्यक्ष अहमद अल-डाहले यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना सांगितले की, "यूजर्संना Text prompts वर आधारित स्टिकर्सचा तयार करता यावे यासाठी मेटामध्ये इमेज जनरेशन मॉडेलचा वापर केला जाणार आहे. फेसबुक मेसेंजरमध्ये यासाठी AI Tech ची मदत घेतली जाईल. या नव्या फीचरमुळे मेसेंजरच्या यूजर्संना स्टिकर्स बनवून वापरता येतील." ते पुढे म्हणाले, "स्वत:ला व्यक्त करण्यासाठी यूजर्संना अधिक पर्याय उपलब्ध होतील." आणखी वाचा - Reliance Jio ने एकाच वेळी लॉन्च केले ५ प्रीपेड प्लॅन्स, बरोबर मिळतेय ‘या’ अॅपचे सबस्क्रिप्शन मेटा सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावर आधारित टूल्स तयार करण्यावर भर देत असल्याचे अहमद अल-डाहले यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "मेटा AI मॉडेल्सवर काम करत असून या मॉडेल्सच्या मदतीने कोणत्याही गोष्टीचे प्रतिमेमध्ये रुपांतर केले जाणार आहे. यामध्ये चित्राचा एकूण रेशो बदलला जाईल. उदा. कॉर्गी कुत्र्याच्या फोटोचे रुपांतर त्याच्या पेंटिंग/ चित्रामध्ये करणे अशा गमतीशीर गोष्टी या मॉडेल्समध्ये पाहायला मिळतील." आणखी वाचा - आता मोबाइलवर मोफत पाहता येणार आशिया कप, विश्वचषक स्पर्धा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मने केली घोषणा जेव्हा मार्क झुकरबर्ग यांनी पहिल्यांदा AI द्वारे समर्थित टूल्स तयार करण्यासाठी नव्या टीमची घोषणा केली, त्यावेळी मेटाच्या उत्पादनांमध्ये भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर पाहायला मिळेल असा अंदाज लोकांनी लावला होता. एप्रिल महिन्यामध्ये याबाबत झुकरबर्ग यांनी व्हॉट्सअॅप, फेसबुक अशा अॅप्समध्ये AI टूल लॉन्च करण्यात येतील अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. यावरुन मेटा कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकण्यासाठी तयार करत असल्याचे लक्षात येते.