Ai+ Nova 2 5G and Ai+ Nova 2 Ultra 5G : सध्याच्या काळात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या अधिक असून भारत स्मार्टफोनची एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे भारतात विविध मोबाईल कंपन्या सातत्याने वेगवेगळे नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच करत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामध्ये लो बजेटपासून ते प्रीमियम फोन्सपर्यंत सर्व स्मार्टफोन बाजारात उपलब्ध असतात. आता कमी बेजटमध्ये आणि उत्तम फीचर असलेले काही स्मार्टफोन AI+ ने भारतात लाँच केले आहेत.
जर तुम्हीही कमी बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी आवश्य वाचा! भारतात सध्या बजेट फ्रेंडली आणि नवीन फिचर्ससह फोन आणण्यासाठी अनेक कंपन्यात स्पर्धा असल्याचं दिसून येतं. पण आता भारतीय स्मार्टफोन ब्रँड असलेल्या AI+ ने Ai+ Nova 2 सीरीज आणि Ai+ Nova Flip 5G लॉन्च केले आहेत. यामध्ये Ai+ Nova 2 5G आणि Ai+ Nova 2 Ultra 5G हे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. यामध्ये अतिशय दमदार ६,०००mAh बॅटरी आणि ५० मेगापिक्सेलचा समोरचा कॅमेरा असलेले हे स्मार्टफोन्स आहेत.
AI+ ने कोणते स्मार्टफोन्स लॉन्च केले?
भारतीय स्मार्टफोन ब्रँड असलेल्या AI+ ने गुरुवारी (९ एप्रिल) आपली नवीन Ai+ Nova 2 सीरीज लॉन्च केली. Ai+ Nova 2 5G आणि Ai+ Nova 2 Ultra 5G हे कंपनीचे नवीन स्मार्टफोन्स आहेत. तसेच या दोन फोन्सच्या व्यतिरिक्त कंपनीने Ai+ Nova Flip 5G या स्मार्टफोन्सचंही अनावरण केलं आहे. यामध्ये नवीन Ai+ Nova 2 सीरीजमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा आणि ६०००mAh बॅटरी आणि १२८ जीबीपर्यंतचं इनबिल्ट स्टोरेज आहे.
Ai+ Nova 2 सीरीजमधील फोन्सच्या किंमती काय आहेत?
Ai+ Nova 2 5G च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत ८,९९९ रुपये आहे. तसेच ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. तसेच या हँडसेटची विक्री १४ एप्रिल दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवरून सुरू असणार आहे. यामध्ये काळा, निळा, हिरवा, गुलाबी आणि जांभळा या रंगांच्या पर्यायांमध्ये फोन्स उपलब्ध असतील.
Ai+ Nova 2 Ultra 5G किंमत किती?
Ai+ Nova 2 Ultra 5G च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये आहे. तसेच ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत १८,९९९ रुपये असणार आहे. या फोनची विक्री १७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्टवरून सुरू होणार आहे. यामध्येही काळा, निळा, हिरवा, जांभळा आणि लाल रंगांमध्ये फोन उपलब्ध असणार आहेत.
Ai+ Nova 2 5G सीरीजची वैशिष्ट्ये काय आहेत?
Ai+ Nova 2 5G आणि Ai+ Nova 2 Ultra 5G हे ड्युअल-सिम (SIM) स्मार्टफोन आहेत. ते अँड्रॉइड 16 -आधारित NxtQ OS येतात. Ai+ Nova 2 Ultra 5G मध्ये १४४Hz रिफ्रेश रेट आणि २५०० nits च्या पीक ब्राइटनेससह ६.७८-इंचाचा १.५K AMOLED डिस्प्लेसह असेल.
Ai+ Nova 2 5G स्मार्टफोनमध्ये १२० Hz रिफ्रेश रेट असलेला ६.७४-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. अल्ट्रा मॉडेलमध्ये ४nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी ७४०० चिपसेट असून त्याला ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी रॅम इनबिल्ट स्टोरेज आहे. तसेच Ai+ Nova 2 5G स्मार्टफोनमध्ये 6nm प्रक्रियेवर आधारित Unisoc T८२०० चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Mali-G57 MP2 GPU, ६ GB पर्यंत रॅम आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेज आहे. दोन्ही फोनमध्ये ६०००mAh ची मोठी बॅटरी आहे.
दरम्यान, फोटोग्राफीसाठी Ai+ Nova 2 Ultra 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या डिव्हाइसमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह ५० MP चा प्रायमरी सोनी IMX752 सेन्सर आहे. या हँडसेटमध्ये ८-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर देखील आहे. तसेच Ai+ Nova 2 5G मध्ये ५०-मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच Wi-Fi, Bluetooth आणि एक USB Type-C पोर्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे.
