एअरटेल ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. रिलायन्स जिओ नंतर, एअरटेल ही एकमेव अशी कंपनी आहे ज्याचा यूजर बेस देशात सर्वात मोठा आहे. भारती एअरटेलकडे अनेक वेगवेगळ्या कॅटगरीमध्ये रिचार्ज प्लॅनमध्ये आहेत. प्रीपेड, पोस्टपेड व्यतिरिक्त एअरटेलकडे इंटरनॅशनल प्लॅन देखील आहेत. एअरटेलकडे वार्षिक प्रीपेड प्लॅन देखील आहेत. आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत ३,३५९ रुपये आहे आणि तो रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करण्याची गरज नाही.

एअरटेलचा ३,३५९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
एअरटेलच्या ३,३५९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता ३६५ दिवस म्हणजे एक वर्ष आहे. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एकदा रिचार्ज केल्यास १ वर्ष रिचार्ज करण्याची डोकेफोडी राहणार नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याचे टेन्शन नाही. या प्लॅनमध्ये दररोज २.५ GB डेटा दिला जातो. म्हणजेच ग्राहक एकूण ९१२.५ जीबी डेटा वापरू शकतात. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो.

businessman was cheated
धक्कादायक! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा व्हिडीओ वापरुन व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक
Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
job opportunity in indian navy
नोकरीची संधी : इंडियन नेव्हीमधील भरती
Indian driving license
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह तुम्ही ‘या’ ९ देशांमध्ये बिनधास्त वाहन चालवू शकता!

आणखी वाचा : Samsung चा बजेट फ्री स्मार्टफोन बाजारात दाखल; जाणून घ्या किंमत आणि फीचर्सबद्दल

याशिवाय प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्सही उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा की ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड स्थानिक आणि एसटीडी कॉल करू शकतात. एअरटेलचे ग्राहक या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मोफत पाठवू शकतात.

आता एअरटेलच्या या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त म्हणजेच फ्री बेनिफिट्सबद्दल बोलूया. प्लॅनमध्ये ग्राहकांना १ वर्षासाठी ४९९ रुपयांचे Disney + Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन मोफत मिळते. याशिवाय अपोलो, फ्री हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिक सेवा देखील मोफत दिल्या जातात. FASTag घेतल्यावर १०० रूपये कॅशबॅक देखील मिळेल.