scorecardresearch

Premium

Airtel वापरकर्त्यांसाठी खुशखबर! २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये आता १.५ जीबी नाही तर मिळणार ‘इतका’ डेटा

एअरटेल कंपनीने आपला २९९ रुपयांचा प्लॅन अपडेट केला आहे.

airtel 299 rsplan offer 2 gb daily deta
एअरटेलच्या २९९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये १४ जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. (फोटो- द इंडियन एक्सप्रेस )

एअरटेल ही देशातील सर्वात मोठी दुसरी टेलीकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओनंतर एअरटेल कंपनीने देशभरामध्ये आपले ५ जी नेटवर्क सुरु केले आहे. तसेच कंपनीकडे आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत ज्यात अनेक फायदे त्यांना मिळतात. एअरटेल कंपनीने नुकतेच आपल्या २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये काही अपडेट्स आणले आहेत. जर का तुमचा सध्याचा प्रीपेड प्लॅन संपणार असेल आणि तुम्ही नवीन रिचार्ज करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एअरटेलच्या २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये द्डरोज १.५ जीबी डेटा मिळत होता. आता कंपनीने या प्लॅनमध्ये काही अपडेट आणले आहेत.

एअरटेलचा २९९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या २९९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये आता १४ जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. म्हणजेच आता या प्लॅनमध्ये १.५ जीबी डेटाएवजी २ जीबी डेटा मिळणार आहे. दैनंदिन डेटा वापरून झाल्यानंतर वापरकर्ते ६४ KBPS पर्यंत डेटा स्पीडचा फायदा उठवू शकतात. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना २८ दिवसांची वैधता मिळते. याबाबतचे वृत्त telecom ने दिले आहे.

tractors
हे ट्रॅक्टर आहेत की रणगाडे? जगभरातली सरकारं ट्रॅक्टर्सना एवढी का भीत आहेत?
vibhor steel tubes make bumper debuts at a premium of 181 percent over issue price
विभोर स्टील ट्यूबचे दमदार पदार्पण; गुंतवणूकदारांना १९३ टक्क्यांच्या बहुप्रसवा परतावा
Loss of Rs 3 per liter on sale of diesel to public sector oil distribution companies
डिझेलवर तेल कंपन्यांना लिटरमागे तीन रुपयांचा तोटा; वर्षाहून अधिक काळ टाळलेल्या किंमतवाढीचा परिणाम
indian share market
विश्लेषणः भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदार कशा पद्धतीनं करतात गुंतवणूक? वाचा सविस्तर

हेही वाचा : Aditya-L1 : ‘आदित्य’चं सूर्याच्या दिशेने आणखी एक पाऊल, ८ दिवसांत पृथ्वीपासून किती दूर पोहोचलं भारताचं यान?

एअरटेल २९९ ट्रू ली च्या अनलिमिटेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड ५ जी डेटा, ३ महिन्यांसाठी अपोलो 24|7 सर्कल मेंबरशिप, मोफत विंक म्युझिक आणि फ्री हेलोट्यून्सचे फायदे देखील मिळतात. अनलिमिटेड ५ जी डेटा फक्त ५ जी नेटवर्क भागातच उपलब्ध आहे. तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉल (लोकल,एसटीडी,रोमिंग) आणि दररोज १०० एसएमएस करण्याचे फायदे मिळतात.

एअरटेलच्या २९९ रुपयांचा ट्रू ली अनलिमिटेड प्लॅन आता एकूण वैधतेच्या कालावधीमध्ये दररोज २ जीबी डेटासह ५६ जीबी डेटा ऑफर करते. तुम्हाला जर का अतिरिक्त डेटाची आवश्यकता असल्यास एअरटेल ३० दिवसांच्या वैधता आणि २५ जीबी बल्क डेटासह २९६ रुपयांचा ट्रू ली प्लॅन ऑफर करते. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या २९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज अतिरिक्त ५०० एमबी डेटा जोडून एअरटेलने प्रतिस्पर्धी बाजारामधील ऑफरशी जुळवून घेण्यासाठी प्लॅनमध्ये मिळणारे फायदे अपडेट केले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Airtel compnay 299 rs prepaid plan offer 2 gb daily deta with wynk music and unlimited voice calls tmb 01

First published on: 11-09-2023 at 09:27 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×