Airtel Network Down: शुक्रवारी (११/०२/२०२२) देशभरातील एअरटेल वापरकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. एअरटेलच्या ब्रॉडबँड (Broadband) आणि मोबाइल ग्राहकांनी शुक्रवारी सोशल मीडियावर नेटवर्क डाउन झाल्याची तक्रार केली. नेटवर्क डाउन झाल्यामुळे एअरटेलच्या फायबर इंटरनेट सेवा तसेच मोबाईल इंटरनेट सेवांवरही वाईट परिणाम झाला.

इंटरनेट आउटेज ट्रॅकर DownDetector नुसार, देशातील विविध शहरे आणि जिल्ह्यांमधील एअरटेल वापरकर्त्यांना या आउटेजमुळे समस्यांना सामोरे जावे लागत आहे. DownDetector च्या मते, एअरटेल यूजर्सना शुक्रवारी ११ वाजल्यापासून इंटरनेटशी संबंधित समस्या होत्या. एअरटेलने या संपूर्ण प्रकरणावर ट्विट करून आउटेजची पुष्टी केली आहे. यासोबतच कंपनीने सांगितले की, एअरटेलच्या नेटवर्कमधील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत आणि आता सर्व सेवा सामान्यपणे कार्यरत आहेत. तरीही अनेक वापरकर्ते सोशल मीडियावर अजूनही सेवा नीट न झाल्याचं सांगत आहेत.

easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

कंपनीने मागतली माफी

आपल्या ग्राहकांची माफी मागत, एअरटेलने ट्विट केले की, “आमच्या इंटरनेट सेवेमध्ये एक तात्पुरती समस्या आली आणि तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आता सर्व काही सामान्य झाले आहे कारण आमची टीम आमच्या ग्राहकांना उत्तम अनुभव देण्याच्या दिशेने काम करत आहे.”

मोबाईल आणि इंटरनेट सेवांबाबत अशा समस्या फारच कमी होतात. आज एअरटेलने सुमारे तासाभरात समस्या सोडवली, परंतु काही दिवसांपूर्वी जेव्हा जिओ (Jio) चे नेटवर्क डाउन होते तेव्हा जिओ ग्राहकांना सुमारे ८ तास सुरळीत सुविधा न्हवती.