एअरटेल देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. आता Bharti Airtel ने त्यांच्या निवडक प्रीपेड ग्राहकांना मोफत हाय-स्पीड डेटाची भेट दिली आहे. एका अहवालानुसार, एअरटेलच्या निवडक युजर्सना १ GB मोफत इंटरनेट डेटा व्हाउचर दिले जात आहेत. ज्या ग्राहकांकडे स्मार्ट प्लॅन आहे ते या मोफत डेटाचा फायदा घेऊ शकतील. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांना टेक्स्ट मेसेज पाठवून फ्री डेटा व्हाउचर मिळवण्याबाबत माहिती देत ​​आहे. हे व्हाउचर त्यांच्या खात्यात जोडले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Onlytech च्या अहवालानुसार, हाय-स्पीड डेटा व्हाउचर मोफत दिले जात आहेत आणि युजर्स Airtel Thanks अॅपच्या कूपन सेक्शनमध्ये जाऊन या डेटाचा फायदा घेऊ शकणार आहेत. लक्षात घ्या की हा डेटा तीन दिवसांसाठी उपलब्ध असेल. आणि तुम्ही यासाठी क्लेम न केल्यास डेटा व्हाउचर १ जून रोजी आपोआप एक्सपायर होईल. माहितीनुसार हा मोफत डेटा केवळ कमी किमतीच्या स्मार्ट प्लान म्हणजेच ९९ रुपयांचा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. एका युजरने दावा केला आहे की हे व्हाउचर १५ मिनिटांत एअरटेल खात्यात जोडले जाईल.

आणखी वाचा : ८००० रुपयांपेक्षा कमी किमतीचा ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करायचाय? मग हे ५ ऑप्शन्स एकदा पाहा

नुकतेच Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन ब्रॉडबँड प्लॅन लॉन्च केले आहेत. या ऑल-इन-वन प्लॅनची ​​किंमत ६९९ रुपये, १०९९ रुपये आणि १५९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये कंपनी 17 OTT अॅप्स आणि DTH (डायरेक्ट-टू-होम) कनेक्शन ऑफर करत आहे. एअरटेलचा १,५९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन 300Mbps, १०९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये 200Mbps आणि ६९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये 40Mbps ऑफर करतो.

एअरटेलच्या या सर्व ब्रॉडबँड प्लॅनमध्ये दरमहा ३.३ टीबी म्हणजेच ३३०० जीबी डेटा दिला जातो. हे ब्रॉडबँड प्लॅन घेणाऱ्या सर्व ग्राहकांना कंपनी वैयक्तिक संबंध व्यवस्थापकासह Airtel Black Priority Care ची सुविधा देखील प्रदान करत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtel free 1gb data offer in 99 rupees smart plan know all about it prp
First published on: 31-05-2022 at 19:09 IST