Airtel Prepaid Plans : एअरटेलच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. TRAI च्या आदेशानंतर एअरटेलने ग्राहकांसाठी फक्त कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लॅन आणले आहेत. त्यामुळे डेटा वापर नसलेल्या आणि फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांना एअरटेलचे हे प्लॅन फायदेशीर ठरणार आहे. एअरटेलने सादर केलेल्या या दोन नवीन प्लॅन्सच्या किमती अनुक्रमे ५०९ व १९९९ रुपये अशा आहेत. पण या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत ते जाणून घेऊ….

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने सर्व मोबाईल ऑपरेटर्सना केवळ कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लॅन सुरू करण्याचे आदेश दिले होते; जेणेकरून इंटरनेटचा वापर न करणाऱ्या ग्राहकांना फायदा होऊ शकेल. ट्रायच्या या आदेशानंतर एअरटेलने असे प्लॅन आणले आहेत की, ज्यामध्ये युजर्सना फक्त कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळेल.

Airtel tariff hike Further tariff hike needed for financial stability: Airtel MD Vittal
Airtel यूजर्सचं टेन्शन वाढले; रिचार्ज महागण्याची शक्यता; कंपनीच्या एमडींच्या ‘या’ विधानाने चर्चांना उधान
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Air india sale namaste world sale for domestic from 1499 and international flights know how to book tickets google trends
आता विमान प्रवास करा फक्त १,४९९ रुपयांत! AIR India देतेय खास ऑफर, जाणून घ्या कशी करायची फ्लाइट तिकीट बुक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद शिरसाट यांच्या पत्नी तेव्हा विमानातच होत्या, पण नेमकं घडलं काय? प्रश्न अनुत्तरीतच!
Jio Launched affordable recharge Plan
Jio Affordable Plan : जिओने गुपचूप लाँच केला स्वस्त रिचार्ज प्लॅन! फक्त ‘इतक्या’ रुपयांमध्ये महिनाभर वापरता येईल इंटरनेट
Airtel vs Jio vs Vi Recharge Plans
Airtel vs Jio vs Vi: फक्त कॉल आणि एसएमएस रिचार्जकरिता कोण देत आहे सर्वात स्वस्त प्लॅन? रोजचा खर्च येईल फक्त ५ रुपये
Mahakumbh, Airline companies , fares ,
‘महाकुंभ’साठीच्या दर ‘भरारी’चे नियंत्रण करण्याची मागणी, विमान कंपन्यांच्या भाडेवाढीविरुद्ध ग्राहक पंचायत आक्रमक
Without internet recharge plans Airtel Jio Vi launches voice and sms only recharge plans cheapest prepaid recharge plans
घरात वायफाय असणाऱ्यांसाठी Airtel-Jio-Vi चा जबरदस्त प्लॅन! दिवसाला फक्त ५ रुपये खर्च, जाणून घ्या किंमत किती

एअरटेलने फक्त कॉलिंग आणि एसएमएससाठी दोन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. तुम्ही ५०९ आणि १९९९ रुपये अशा अनुक्रमे किमतीनुसार तुम्हाला हवा तो प्लॅन तुम्ही रिचार्ज करू शकता.

एअरटेलचा ५०९ रुपयांचा प्लॅन (Airtel’s Rs 509 Recharge Plan)

एअरटेलच्या ५०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि ९०० फ्री एसएमएसची सुविधा मिळेल. त्यासह तुम्हाला Apollo 24/7 चे मोफत सबस्क्रिप्शनदेखील मिळेल. त्यामध्ये तुम्ही मोफत हॅलो ट्यूनचाही लाभ घेऊ शकता. एअरटेल याआधी याच प्लॅनमध्ये याच किमतीत 6GB डेटाची ऑफर देत होता.

एअरटेलचा १९९९ रुपयांचा प्लॅन (Airtel’s Rs 1999 Recharge Plan)

एअरटेलचा १९९९ रुपयांचा प्लॅन ३६५ दिवसांच्या म्हणजेच एक वर्षाच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये युजरला अनलिमिटेड कॉलिंग आणि ३६०० फ्री एसएमएसची सुविधा दिली आहे. त्यासह तुम्हाला Apollo 24/7 सर्कल मेंबरशिप आणि मोफत Hello Tunes ची सुविधा मिळेल. एअरटेल याआधी या प्लॅनमध्ये याच किमतीत 24GB चा डेटा देण्यात येत होता.

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी फक्त कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. परंतु, प्लॅन्सच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. प्लॅनमधील फक्त डेटाची सुविधा काढून टाकली आहे. त्यामुळे ग्राहकांनी रिचार्ज प्लॅन खरेदी करताना थोडी काळजीपूर्वक निवड करावी.

Story img Loader