Airtel recharge plans: सध्या मोबाईल रिचार्ज महाग झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील आघाडीच्या कंपन्या एअरटेल आणि जिओने आपल्या मोबाईल रिचार्जच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. याचा सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला आहे. रिचार्जच्या वाढत्या किंमती ग्राहकांचे टेन्शन वाढवत आहेत. यामुळे अनेक जण स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान शोधत आहेत. अशातच एअरटेलने अलीकडेच त्यांच्या ३८ कोटींहून अधिक मोबाइल यूजर्ससाठी एअरटेलने आपल्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी एक नवीन ₹४८ चा प्लॅन लॉन्च केला आहे. ज्यांना कमी किमतीत डेटासोबत ओटीटी लाभ घ्यायचा असेल त्यांच्यासाठी हा भन्नाट प्लॅन एअरटेलने आणला आहे. या प्लॅनमुळे जिओला नक्कीच धक्का बसेल असं तज्ज्ञ सांगतात. या प्लॅनचं वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना इंटरनेट आणि मनोरंजन या दोन्हींचा ॲक्सेस कमी पैसात मिळणार आहे.
या प्लॅनचा हा जबरदस्त फायदा
एअरटेलने आणलेल्या नवीन प्लॅन हा ४८ रुपयांचा असणार असून यामध्ये ग्राहकांना १ जीबी ४जी डेटा मिळणार आहे. त्यासोबत जिओहॉटस्टारचे एक महिन्याचे सबस्क्रिप्शनदेखील मिळणार आहे. मात्र, या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएससारख्या कोणत्याही सेवेची वैधता राहणार नाही. हे केवळ एक डेटा व्हाउचर असून त्याची स्वतःची वैधता राहणार आहे. या प्लॅनची एकूण वैधता एक महिना राहणार असून ओटीटी ॲक्सेससुद्धा त्याच कालावधीपुरता मर्यादित असणार आहे.
स्वस्त दरात घ्या OTT आणि IPL चा आनंद
एअरटेलने लॉन्च केलेल्या प्लॅनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जिओहॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शनचा समावेश राहणार आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे, वापरकर्ते इंडियन प्रीमियर लीग २०२६, म्हणजेच आयपीएल २०२६ चे सामने देखील तुम्ही मजा घेऊ शकणार आहे. जर तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी नक्कीच भन्नाट होणार आहे. कारण तो अत्यंत कमी किमतीत थेट सामने पाहण्याची संधी यामुळे तुम्हाला मिळणार आहे.
या प्लॅनचा या ग्राहकांना होणार फायदा
आता प्रश्न हा आहे की, या प्लॅनचा फायदा कोणत्या ग्राहकांना होणार आहे. तर या प्लॅनचा फायदा ज्यांच्याकडून आधीपासूनच बेस प्लॅन वापरत आहेत. ज्यांना फक्त अतिरिक्त डेटा आणि ओटीटी ॲक्सेसची आवश्यकता आहे. हा नवीन डेटा व्हाउचर देशभरात सध्या काही सर्कल्यमध्ये सुरू होणार आहे.
एअरटेलकडे इतर ओटीटी प्लॅन्स कोणते?
खरंतर एअरटेलकडे ओटीटी लाभ देणारे अनेक प्लॅन्स आधीपासूनच आहे. जिओहॉटस्टारचा ॲक्सेस असलेले आधीपासून सुरुवात केलेले १९५, २७९ आणि ३६१ प्लॅन्स आहेत. विशेष म्हणजे, २७९ च्या प्लॅनमध्ये एका महिन्याच्या वैधतेसह नेटफ्लिक्स आणि झी5 चे सबस्क्रिप्शनदेखील तुम्हाला मिळणार आहे.
