जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी एअरटेल आणि रिलायन्स जिओमध्ये स्पर्धा सुरू आहे. दोन्ही कंपन्या परवडणाऱ्या आणि स्वस्त रिचार्ज प्लॅनसह अधिकाधिक नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. एअरटेलचे २०० रुपयांपेक्षा कमी किमतीत दोन प्रीपेड प्लॅन आहेत, ज्यांची किंमत १७९ रुपये आणि १५५ रुपये आहे. रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे १९९ रुपये आणि ११९ रुपयांचे प्रीपेड प्लॅन ऑफर करते. Jio आणि Airtel च्या या प्लॅन्समध्ये काय फायदे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शेवटी २०० रुपयांपेक्षा कमीत जास्त फायदा कोण देत आहे?

Airtel चा १७९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
एअरटेलच्या १७९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये कंपनी एकूण २ GB हाय-स्पीड डेटा देते. याशिवाय या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलची सुविधा मिळते. याशिवाय एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ३०० एसएमएस देखील देण्यात आले आहेत.
अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलताना, एअरटेल ग्राहकांना मोफत HelloTunes आणि Wynk Music वर फ्री एक्सेस देखील मिळतो.

आणखी वाचा : e-challan Online: घरबसल्या ई-चलन भरा, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Airtel चा १५५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
एअरटेलच्या १५५ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता २४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये एकूण १ GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनचे रिचार्ज केल्यावर एअरटेल ग्राहकांना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलची सुविधा मोफत मिळू शकते. प्लॅनमध्ये ३०० एसएमएस सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय एअरटेलच्या या प्लॅनमध्ये HelloTunes आणि Wynk Mysic देखील ऑफर आहेत.

Reliance Jio चा १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
Jio च्या १९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहक एकूण ३४.५ जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत. याशिवाय दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात.
Jio च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहेत.

आणखी वाचा : iPhone 12 खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १२ हजार रूपयांपेक्षा जास्त सूट

Reliance Jio चा ११९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
Jio च्या ११९ रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता १४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज १.५ GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये एकूण २१ GB डेटा ऑफर करण्यात आला आहे. जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिडेट कॉल उपलब्ध आहेत. याशिवाय ३०० एसएमएसही मोफत दिले जातात. जिओच्या इतर रिचार्ज प्लॅन्सप्रमाणे या प्लॅनमध्येही JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहेत.