एअरटेल टेलिकॉम कंपनीच्या लॉग टर्म प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये दोन प्लॅन सर्वाधिक लोकप्रिय आहेत, जे रु. २,९९९ पॅक आणि रु ३,३५९ प्लॅन आहेत. जर या दोन्ही योजना तुमच्या बजेटपेक्षा जास्त असतील आणि तुम्ही लॉग टर्म वैधतेसह परवडणारी रिचार्ज योजना शोधत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी रु. २,००० अंतर्गत सर्वोत्तम वार्षिक रिचार्ज योजना सांगत आहोत. एअरटेल कंपनीने आपल्या लॉग टर्म वार्षिक प्रीपेड रिचार्ज योजना रु. २,००० अंतर्गत आणल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला वर्षभर अनेक फायदे मिळतील.

एअरटेल टेलिकॉम कंपनीच्या या वार्षिक परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत १,७९९ रुपये आहे. या किंमतीत ग्राहकांना ३६५ दिवसांपर्यंत वैधता मिळेल.

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
loksatta analysis midcap and smallcap stocks surged
विश्लेषण: सरत्या वर्षात शेअर बाजारात तेजीच तेजी… ‘स्मॉल कॅप’ ठरले छोटे उस्ताद! तेजीचे आणखी कोण भागीदार?

(हे ही वाचा: तुमचे WiFi कनेक्शन स्लो होत आहे का? जाणून घ्या कारण आणि महत्त्वाच्या गोष्टी)

काय असतील फायदे?

फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, एअरटेलच्या ग्राहकांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळेल. याशिवाय, ग्राहकांना एका वर्षासाठी प्लॅनमध्ये ३,६०० मोफत एसएमएस मिळतात.

(हे ही वाचा: ५९ रुपयांमध्ये ३GB हाय स्पीड डेटा, Airtel चे सर्वात स्वस्त प्लॅन!)

डेटाबद्दल बोलायचे झाले तर, हा प्लॅन १ वर्षाच्या वैधतेसह २४ GB डेटा ऍक्सेस ऑफर करतो. म्हणजेच हा २४ जीबी डेटा तुम्ही ३६५ दिवसांसाठी वापरू शकता. २४ जीबी डेटा संपल्यानंतर, तुम्ही इतर डेटा पॅक सक्रिय करून वर्षभर या प्लॅनचा आनंद घेऊ शकता.

(हे ही वाचा: Boat चे स्वस्त Airdopes 111 इयरबड भारतात लाँच, देतात २८ तासांचा बॅटरी बॅकअप!)

या एअरटेल पॅकमध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएस फायद्यांव्यतिरिक्त आणखी बरेच काही आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना Apollo 24/7 Circle चे फायदे मिळतील. फ्री हॅलोट्यून्स, विंक म्युझिक इत्यादींचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध असेल. याशिवाय FASTag वर १०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल.