Amazfit falcon smartwatch launch in india : अमेझफिटने आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त घड्याळ लाँच केली आहे. कंपनीने भारतात amazfit falcon स्मार्टवॉच ४४ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध केली आहे. ही प्रिमियम मल्टी स्पोर्ट जीपीएस घड्याळ असल्याचे कंपनीकडून सांगितले जाते. ही घड्याळ ३ डिसेंबरपासून कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑर्डर करता येऊ शकते. ग्राहक १ डिसेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान प्रि ऑर्डर्स देखील करू शकतात.

घड्याळ्यात काय आहे खास?

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
Indians in Cambodia cyber scams
सायबर गुन्हेगारीत अडकलेल्या ७५ भारतीयांची कंबोडियातून सुटका; ६ महिन्यात ५०० कोटी लुटले
PM narendra modi wears jacket made from plastic bottles and old clothes
VIDEO : “टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या अन् उरलेल्या कपड्यांपासून तयार केले अंगावरील जॅकेट”; पंतप्रधान मोदी यांनी स्वत: सांगितले

फाल्कन घड्याळात झेप कोच हे आर्टिफिशल इंटेलिजन्सद्वारे चालणारे स्मार्ट कोचिंग अल्गोरिदम देण्यात आले आहे, जे युजरच्या शारीरिक वैशिष्ट्यांवर आधारित मार्गदर्शन देते. युजर अतिव्यायाम करत आहे की नाही हे झेप कोच ओळखते आणि त्यानुसार योग्य प्रशिक्षण होण्यासाठी व्यायामाच्या पथ्यांची तीव्रता सुधारते.

(ट्रायने उचलली पावले… आता मार्केटिंग कंपन्यांच्या त्रासदायक कॉल्स आणि मेसेजेसपासून होईल सुटका)

अमेझफिट फाल्कन स्मार्टवॉच अडव्हान्स ट्रेनिंग सपोर्टसह मिळते. घड्याळात १५० स्पोर्ट्स मोड मिळतात. यामध्ये काईट सर्फिंग, गोल्फ स्विंग यांसरख्या उच्च स्पीड जलक्रीडांसह इतर मोड्सचा समावेश आहे. एथलीटसाठी या स्मार्टवॉचमध्ये ट्रायथलॉन मोडही मिळतो.

निर्मात्यांच्या मते, वापरकर्त्याच्या क्रियाकलापाच्या संपूर्ण कालावधीत स्पोर्ट्स मोड डेटा स्क्रीनवर असतो. या व्यतिरिक्त घड्याळात संगीत सेव्ह करता येऊ शकते, जे तुम्ही ब्लूटूथ इयरफोनद्वारे ऐकू शकता. घड्याळ एअरक्राफ्ट ग्रेड टी ४ टायटॅनियम युनिबॉडीने बनलेली आहे. घड्याळात सफायरने बनवलेली गंजण्यापासून सुरक्षित असलेली क्रिस्टल ग्लास स्क्रीन देण्यात आली आहे. अमेझफिटनुसार, स्क्रीन तब्बल १५ लष्करी दर्जाच्या चाचण्या उत्तीर्ण करू शकते.