Amazon.com Inc’s layoffs : मागील काही महिन्यांपासून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी उलथापालथ होतना दिसत आहे. ट्विटर, मेटा आणि गुगल यांसारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांनी कर्माचारी कपातीचा मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा कर्मचारी वर्गाला मोठा फटका बसणार आहेत. कारण जगातील नावाजलेल्या कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅमेझॉनमध्येही तब्बल १८ हजारांहून अधिक कर्माचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार असल्याची माहिती खुद्द सीईओ अॅंडी जॅसी यांनी दिलीय. बुधवारी जॅसी यांनी कर्माचारी कपात करणार असल्याचं जाहीर केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, १८ जानेवारीपासून कर्माचारी कपात करण्यात येणार असल्याचं अॅमेझॉनकडून घोषीत करण्यात आलं आहे. या कर्माचारी कपातीचा मोठा फटका इ-कॉमर्स आणि मानव संसाधनला बसणार असल्याचं जॅसी यांनी म्हटलं आहे. अॅमेझॉनच्या ६ टक्के कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. त्यांच्याकडे जवळपास ३ लाख कॉर्पोरेट कर्मचारी नोकरीवर असल्याची माहिती आहे. अनिश्चित अर्थव्यवस्थेसाठी वार्षिक प्लॅनिंग खूप कठीण जाणार आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून कर्माचाऱ्यांची मोठी भरती करण्यात आली आहे, असंही ते म्हणाले आहेत.

नक्की वाचा – ‘Flipkart’ला निष्काळजीपणा भोवला! १२,४९९ रुपयांचा मोबाईल न दिल्याने महिलेला द्यावे लागले ४२ हजार

अॅमेझॉनमध्ये १.५ मिलियन कर्मचारी काम करतात. यामध्ये वेअरहाऊस स्टाफचाही समावेश आहे. वॉलमार्ट आयएनसी नंतर (WMT.N)अमेरिकेतील दुसरी मोठी खासगी कंपनी म्हणून अॅमेझॉनकडे पाहिले जाते. दरम्यान, गुगलही कर्मचारी कपात करण्याचा योजन आखत असल्याची माहिती नोव्हेंबर २०२२ मध्य समोर आली होती. या नवीन वर्षात कंपनीतील ६ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाणार असल्याची माहिती आहे. गुगलने २०१७ पासून दरवर्षी कर्मचाऱ्यांची संख्या २० टक्क्यांनी वाढवली असल्याचे म्हटले जाते. भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी कपात करण्यात यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला होता.

या कंपनीनेही केली होती कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा

नुकतंच काही आयटी कंपन्यांनी कर्माचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात केल्याची घोषणा केलीय. मेटा प्लॅटफॉर्म्स इंक आणि amazon.com इंकने जवळपास १०००० कर्माचाऱ्यांची कपात सुरु केली. तसंच ट्विटर इंकने त्यांच्या ७५०० कर्मचाऱ्यांमध्ये अर्ध्याहून अधिक जणांना कामावरून काढून टाकलं. तर सिस्को सिस्टम इंकने मागच्या आठवड्यात नोकरी आणि कार्यालय कमी करण्याची घोषणा केली. हाय ड्राईव्ह निर्माता सिगेट टेक्नोलॉजी होल्डिंग्स पीएलसीनेही जवळपास तीन हजार नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात केली होती.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon ceo andy jassy announced amazon job cuts to exceed 18000 roles lay off starts from january 18 nss
First published on: 05-01-2023 at 12:54 IST