अमेझॉनने अखेर अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलची तारीख निश्चित केली आहे. कंपनीने ॲपवर सेलचा बॅनर लाईव्ह केला असून, त्यामध्ये सेल २३ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र, हा सेल किती काळ चालेल याबाबत कंपनीने काहीही सांगितले नाही. तसंच सेल्समध्ये असलेल्या ऑफर्सची घोषणा सुद्धा कंपनीद्वारे करण्यात आलेली आहे. मेगा फेस्टिव्हल सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि ब्युटी, होम आणि किचन अप्लायन्सेस, टीव्ही, किराणा सामान आणि बरेच काही कमी किंमतीत खरेदी करू शकतात.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर अशी माहिती मिळाली आहे की, जर ग्राहकांनी फेस्टिव्हल सेलमध्ये खरेदीसाठी एसीबीआय कार्डचा वापर केला तर त्यांना १०% इन्स्टंट डिस्काउंट दिला जाईल. तसंच ग्राहकांच्या पहिल्या खरेदीवर त्यांना १०% कॅशबॅक देखील दिला जाईल.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती

( हे ही वाचा: Lava Probuds N11 लाँच; Amazon वर फक्त ११ रुपयांमध्ये ३ दिवसांसाठी असेल उपलब्ध)

Amazon Great Indian Festival Sale बद्दल तुम्हाला हे माहिती असणे आवश्यक आहे.

  • अमेझॉन iPhone 13 आणि iQOO 9T सारख्या इतर प्रीमियम फोनवर मोठ्या प्रमाणात सवलत देईल असे मानले जाते. Apple ने अलीकडेच आयफोन १४ लाँच केला आहे, त्यामुळे आयफोन १३ ची किंमत कमी होण्याची अपेक्षा आहे. टिपस्टर अभिषेक यादवच्या मते, आयफोन १३ ची किंमत ५३,००० ते ५४,००० रुपयांच्या दरम्यान असू शकते. यामध्ये बँक ऑफर आणि सवलतींचा समावेश असेल. याव्यतिरिक्त, खरेदीदार नवीन फोनसाठी त्यांचा जुना फोन देखील एक्ससेंज करू शकतील.
  • Amazon Realme, Xiaomi आणि OnePlus सारख्या स्मार्टफोन ब्रँड्सवरही भरपूर सवलत देणार आहे. Nord CE 2 Lite, Nord 2 आणि इतरांसह OnePlus फोन सवलतीच्या दरात विकले जातील.
  • Amazon नवीन लाँच केलेले फोन देखील विकेल, ज्यात गॅलेक्सी फोल्ड सीरीज आणि Redmi Prime 11 5G यांचा समावेश आहे.
  • Samsung Galaxy M32 5G १५,००० ते २०,००० रुपयांच्या दरम्यान उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या सॅमसंग डिव्हाइसचा ५जी प्रकार सध्या अमेझॉनवर १८,९९९ मध्ये विकला जात आहे. Amazon Great Indian Festivcal सेल दरम्यान सध्याच्या विक्री किमतीपेक्षा किंमत कमी होण्याची अपेक्षा आहे.
  • अमेझॉनने आपल्या वेबसाईटवर सांगितले आहे की ते आयफोन १२ वर मोठ्या प्रमाणात सूट देणार आहेत. फेस्टिव्हल सेलमध्ये आयफोन १२ ची किंमत ५२,९९९ रुपये असेल. डिव्हाइसची मूळ किंमत ६५,९९० रुपये आहे. अमेझॉन आयफोन १२ वर मोठ्या डील ऑफर करेल. याव्यतिरिक्त, बँक ऑफर तसेच एक्सचेंज ऑफर देखील असतील.