Amazon Great Indian Festival 2024 : फ्लिपकार्ट व अ‍ॅमेझॉनमध्ये (Amazon) अनेकदा सेलसंबंधित स्पर्धा पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी फ्लिपकार्टने आपल्या बिग बिलियन डेज सेलची घोषणा केली होती. तर, आता अ‍ॅमेझॉनने आपला यंदाचा सर्वांत मोठा सेल म्हणजे ग्रेट इंडियन सेलची घोषणा केली आहे. अ‍ॅमेझॉनचा हा सेल २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच अ‍ॅमेझॉन इंडियाने आगामी सेलदरम्यान डिस्काउंटवर उपलब्ध असणाऱ्या स्मार्टफोन्सच्या नावांची यादी जाहीर केली आहे. चला तर नक्की कोणत्या वस्तूंवर किती सूट असणार आहे हे आपण या बातमीतून सविस्तर जाणून घेऊ…

Amazon ने जाहीर केल्यानुसार त्यांच्या अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२४ सेल इव्हेंटमध्ये वनप्लस ११ आर, वनप्लस १२, वनप्लस १२ आर, वनप्लस नॉर्ड सीई ४ लाईट, वनप्लस नॉर्ड सीई ४, रिअलमी नाझरो ७० प्रो व रिअलमी जीटी ६ टी तर आयक्यूओओ झेड ९ प्रो, आयक्यूओओ झेड ९ लाईट, आयक्यूओओ झेड ९ प्रो, आयक्यूओओ १२, गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा, गॅलेक्सी एम १५ आदी स्मार्टफोन्सवर भरघोस सूट मिळणार आहे.

हेही वाचा…Big Billion Days Sale 2024 : ‘या’ चार स्मार्टफोन्स ब्रॅण्डवर कॅशबॅक, स्मार्ट टीव्ही, फ्रिजवर सूट; कोणत्या वस्तूवर नेमकी किती सूट? जाणून घ्या

स्मार्ट टीव्हीवर ६५ टक्के सूट :

तसेच शाओमी (Xiaomi) फोन घेण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांना या सेलमध्ये डिस्काउंट देण्यात येईल. या सेलमध्ये शाओमी १४ सीव्ही, रेडमी १३, रेडमी नोट १३, शाओमी १४ आदी आणि Tecno, ऑनर, ओपो व विवो या विविध कंपन्यांचे फोनदेखील खरेदीसाठी उपलब्ध असतील. ॲमेझॉनच्या या सेलमध्ये मोबाईल ॲक्सेसरीजवर ८० टक्के सूट देण्यात येईल. त्यामध्ये वायरलेस TWS इयरफोन जसे की वनप्लस नॉर्द बड्स २आर , सोनी सी७००, पॉवर बँक, चार्जर, चार्जिंग केबल्स आदींचा समावेश असेल. तर लॅपटॉवर ४० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येईल.

याव्यतिरिक्त वॉशिंग मशीनवर ६० टक्के, फ्रिज व एअर कंडिशनरवर ५५ टक्के, तर मायक्रोवेव्हवर ६५ टक्के, स्मार्ट टीव्हीवर ६५ टक्के सूट देण्यात येणार आहे. अ‍ॅमेझॉनच्या प्रत्येक सेलप्रमाणे या सेलमध्येदेखील प्राइम मेंबर्सना एक दिवस आधीच सर्व ऑफर्सचा फायदा घेता येईल. जर तुम्ही नवीन गॅझेट, खासकरून स्मार्टफोन घेण्याचा विचार करीत असाल, तर आगामी ग्रेट इंडिया फेस्टिवल सेल तुमच्यासाठी योग्य वेळ ठरू शकते. फक्त पाच दिवसांत अ‍ॅमेझॉनचा (Amazon) हा सेल सुरू होईल आणि तुम्ही डिस्काउंटसह तुमच्या आवडत्या, गरजेच्या वस्तू या सेलमध्ये खरेदी करू शकणार आहात.