Premium

Amazon Great Indian Festival Sale: १० ऑक्टोबरपासून सुरू होणार सेल; ‘या’ प्रॉडक्ट्सवर मिळणार आकर्षक ऑफर्स, VIDEO पाहाच

आगामी काळात विक्रीसाठी अ‍ॅमेझॉन इंडियाने सॅमसंग आणि इंटेलसह पार्टनरशिप केली आहे.

Amazon Great Indian Festival sale 2023
अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२३ (Image Credit- Amazon)

Amazon इंडिया ही एक लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाईट आहे. यावरून खरेदीदार त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करू शकतात. या वस्तू खरेदी करत असताना त्यांना अनेक प्रकारचे डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स मिळत असतात. तसेच कंपनी ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे सेल घेऊन येत असते. अ‍ॅमेझॉन इंडियाने आपल्या आगामी फेस्टिव्हल सेल म्हणजेच ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२३ चा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. सेलच्या अधिकृत बॅनरनुसार, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल लवकरच सुरु होणार आहे. ज्यामध्ये प्राइम सबस्क्रायबर्सना सुरुवातीला अ‍ॅक्सेस दिला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी काळात विक्रीसाठी अ‍ॅमेझॉन इंडियाने सॅमसंग आणि इंटेलसह पार्टनरशिप केली आहे. ग्रेट इंडियन फेस्टिव्हलदरम्यान सॅमसंग प्रॉडक्ट्स आणि इंटेल प्रोसेसर आधारित कॉम्प्युटरवर आकर्षक डील्स आणि डिस्काउंट मिळण्याची शक्यता आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाने त्यांच्या आगामी सेलबद्दल अधिक माहिती उघड केलेली नाही आहे. तरीही दिग्गज ई-कॉमर्स असलेल्या या कंपनीने SBI डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी १० टक्के डिस्काउंट मिळणार असल्याची पुष्टी केली आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

हेही वाचा : व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी मोठी बातमी! २४ ऑक्टोबरनंतर ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार नाही अ‍ॅप; काय आहे कारण?

अनेक रिपोर्टनुसार, Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२३ हा १० ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. खरेदीदारांना स्मार्टफोन, लॅपटॉप आणि घरगुती प्रॉडक्ट्सवर आकर्षक डिस्काउंट मिळण्याची अपेक्षा आहे. वनप्लस ११ , सॅमसंग Galaxy S23 आणि मोटोरोला Razr 40 अल्ट्रा सारख्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे. याशिवाय आयफोन १३ आणि आयफोन १४ सिरीजच्या मॉडेल्ससह Apple च्या विविध प्रॉडक्ट्सवर ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणे अपेक्षित आहे.

त्याचप्रमाणे फ्लिपकार्टने देखील त्याच्या आगामी बिग बिलियन डेज सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये सॅमसंग गॅलॅक्सी S21 FE, Realme 11 Pro+ आणि Motorola Edge 40 अन्य फोन्सवर आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. हा सेल १ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. Amazon आणि Flipkart चा आगामी सेल हा दिवाळीमध्ये नवीन वस्तू खरेदी करणाऱ्याची योजना आखत असलेल्यांना फायदेशीर ठरेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amazon great indian festival sale 2023 start 10 october early for prime members tmb 01

First published on: 26-09-2023 at 09:18 IST
Next Story
व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी मोठी बातमी! २४ ऑक्टोबरनंतर ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार नाही अ‍ॅप; काय आहे कारण?