scorecardresearch

ChatGPT वरून Amazon चा कर्मचाऱ्यांना इशारा; म्हणाले…

ChatGPT हे टूल OpenAI ने विकसित केले आहे. आता हेच चॅटजीपीटी टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात गेमचेंजर ठरणार आहे.

amazon alert employee for chatgpt
Amazon And ChatGpt – लोकसत्ता ग्राफिक्स टीम

ChatGpt : सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळा तुम्हाला हवी असलेली माहिती मिळते. आणि ते शोधण्यासाठी तुम्हाला दुसरीकडे जावे लागत नाही. ChatGPT हे टूल OpenAI ने विकसित केले आहे. आता हेच चॅटजीपीटी टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात गेमचेंजर ठरणार आहे. आता Amazon कंपनीने कर्मचार्‍यांना ChatGPT वर गोपनीय डेटा न ठेवण्याचा इशारा दिला आहे.

इंटर्नल स्लॅक ग्रुपवर शेअर करण्यात आलेल्या बिझनेस इनसाइडरने पुनरावलोकन केलेल्या मेसेजेसनुसार अ‍ॅमेझॉनचे कर्मचारी चॅटजीपीटीचा वापर रिसर्चसाठी आणि रोजच्या येणाऱ्या समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी करत आहेत. काही अहवालानुसार Amazon कर्मचारी नोकरीच्या मुलाखतीमधील प्रश्नांची उत्तरे, सॉफ्टवेअर कोड लिहिण्यासाठी चॅटबॉटचा वापर करत आहेत. Amazon शी संबंधित एका कॉर्पोरेट वकीलाने कर्मचाऱ्यांना त्याच्या वापराबद्दल चेतावणी दिली आहे.

हेही वाचा : ChatGpt वापरणाऱ्यांच्या खिशाला लागणार कात्री, मोजावे लागणार ‘इतके’ पैसे; जाणून घ्या

तुमचे इनपुट्स चॅटजीपीटीसाठी ट्रेनिंग डेटा म्हणून ववापरले जाऊ शकतात. तसेच आम्ही हे नाही म्हणत आहोत की याच्या आऊटपुटमध्ये आमची गोपनीय माहिती असू शकते असे वकिलांनी अहवालानुसार सांगितले. अ‍ॅमेझॉनचे कर्मचारी चॅटबॉटच्या फायद्यांमुळे प्रभावित झाले आहेत. अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिस क्लाउड युनिटच्या सदस्यांनी सांगितले की, ChatGPT वापरकर्त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे चांगले काम करत आहे. तसेच खूप ताकदवान आणि मोठ्या प्रमाणात डेटा संकलित करत आहे.याचा अर्थ असा नाही नाही की ChatGPT मध्ये होऊ शकत नाही. हे तयार करणाऱ्या OpenAi कंपनी काही महिन्यांमध्ये आणखी प्रगती यामध्ये करू शकते. अनेक लोकांचे म्हणणे आहे की चॅटजीपीटी हे गुगल सर्च इंजिनसाठी धोकादायक ठरू शकते.

या दोन प्लॅटफॉर्ममधील महत्वाचा फरक म्हणजे ChatGPT ऑनलाईन उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारे एकच उत्तर देते. दुसरीकडे Google बातम्या आणि जर्नल्सवर आधारित उत्तर देते. तसेच ते अनेक परिणामदेखील दर्शवते ज्यामुळे वापरकर्ते स्वतःचे संशोधन करू शकतात.

हेही वाचा : नाव मोठं, लक्षण खोटं: ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये टॉयलेटला जायचीही चोरी, कर्मचाऱ्यांनी मांडल्या व्यथा

गेल्या वर्षी एका अहवालात सांगण्यात आले होते की, Googleच्या व्यवस्थापनाने ChatGPT ला “कोड रेड” मानले होते. सीईओ सुंदर पिचाई यांनी कंपनीतील अनेक टीम्सना ओपन एआय आणि चॅटजीपीटीच्या प्लॅटफॉर्म Dalle-e प्रमाणे कला आणि चित्रे तयार करण्यास सक्षम असे दुसरे व्यासपीठ तयार करण्यास सांगितले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 14:02 IST
ताज्या बातम्या