Amazon prime video yearly plan launch : अमेझॉनने भारतीय युजर्ससाठी एक भन्नाट वार्षिक प्लान उपलब्ध केला आहे. हा प्लान स्वस्त असून त्याची किंमत कवळ ५९९ रुपये प्रति वर्ष आहे. देशात आधीपासून अमेझॉनचे तीन प्लान्स आहेत. सदस्यता वैधता कालावधीच्या बाबतीत हे तिन्ही प्लान्स भिन्न आहेत. आता कंपनीने युजरसाठी स्वस्त वार्षिक प्लान उपलब्ध केला आहे. मात्र, या सब्सक्रिप्शन प्लानने युजरला केवळ मोबाईलवर व्हिडिओ पाहता येईल.

हा प्लान सब्सक्राइब केल्यावर युजरला स्टँडर्ड डेफिनेशन क्वालिटीमध्ये व्हिडिओ पाहता येईल. या प्लानमध्ये उच्च रेझोल्युशनमध्ये व्हिडिओ पाहता येणार नाही. त्यासाठी इतर पर्याय निवडावे लागतील. या प्लानमध्ये ऑफलाइन कंटेंट पाहता येते आणि लाइव्ह क्रिकेट सामन्यांसह तुम्ही अ‍मेझॉन ओरिजिनल कंटेंटचा देखील आनंद घेऊ शकता. युजरला भारतीय किंवा आतरराष्ट्रीय शो किंवा चित्रपट देखील पाहता येतील.

Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
IPO, financial year 2023-24, investments, companies, 62,000 crore,
‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी
home loan from bank of india marathi news, bank of india home loan marathi news, bank loan cheaper marathi news
बँक ऑफ इंडियाकडून घरांसाठी कर्ज स्वस्त, प्रक्रिया शुल्कही माफ; सवलतीतील ८.३ टक्के व्याजदराचा लाभ मात्र ३१ मार्चपर्यंतच!
Credit policies of three central banks are important for the stock market
शेअर बाजारासाठी अग्निपरीक्षेचा काळ ! तीन जागतिक मध्यवर्ती बँकांचे व्याजदर धोरण ठरवणार आगामी कल

(SONY PS VR 2 गेमिंगचा आनंद करेल द्विगुणित, ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा व्हिडिओ)

मागील वर्षी भारती एअरटेलने अमेझॉन प्राइम व्हिडिओचे मोबाइल व्हर्जन लाँच केले होते. सुरुवातीला हे व्हर्जन केवळ या सेवेच्या प्रिपेड प्लानची खरेदी केलेल्या युजरसाठी उपलब्ध होते. आता अमेझॉनने अधिकृतरित्या हा प्लान लाँच केल्याने तो आता सर्वांसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांसाठी मासिक प्लान देखील उपलब्ध आहेत. ८९ रुपयांपासून सुरू होणारे काही मासिक प्लान्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये एसडी क्वालिटीमध्ये अमेझॉन प्राइम व्हिडिओचा आनंद घेता येऊ शकतो.