यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त Amazon Pay ने गिफ्ट कार्ड्ससाठी खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत. फिजिकल गिफ्ट कार्ड्ससोबत प्रीमियम राखी गिफ्ट बॉक्स, सेम-डे आणि नेक्स्ट-डे डिलिव्हरी तसेच आकर्षक कॅशबॅकचा यात समावेश आहे. फिजिकल गिफ्ट कार्ड्सच्या खरेदीवर ५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक, तर ई-गिफ्ट कार्ड्सवर १५० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. गिफ्ट कार्ड्सची सुरुवात फक्त १० रुपयांपासून होते. ही कार्ड्स Amazon वरील कोट्यवधी उत्पादनांसह विविध पार्टनर अॅप्सवर वापरता येतात.

AI च्या मदतीने गिफ्ट कार्ड करा पर्सनलाइज

रक्षाबंधनासाठी Amazon Pay ने गिफ्ट कार्डमध्ये नवीन personalization features आणले आहेत. यामध्ये भावंडासोबतचा फोटो अपलोड करून कस्टम कार्ड तयार करण्याची सुविधा आहे. याशिवाय राखी-थीम असलेले animated designs आणि प्राप्तकर्त्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार Gen AI-generated designs देखील उपलब्ध आहेत.

प्रीमियम राखी गिफ्ट बॉक्स

फिजिकल गिफ्ट कार्ड्स खास डिझाइन केलेल्या प्रीमियम राखी गिफ्ट बॉक्समध्ये उपलब्ध आहेत. शेवटच्या क्षणी गिफ्ट देणाऱ्यांसाठी निवडक ठिकाणी सेम-डे डिलिव्हरी, तर काही शहरांमध्ये आणि पात्र पिनकोडवर नेक्स्ट-डे डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध आहे.

Amazon Pay ICICI कार्डधारकांना अतिरिक्त फायदा

Amazon Pay ICICI Bank Credit Card धारकांना गिफ्ट कार्ड्सच्या खरेदीवर फ्लॅट २ टक्के अमर्याद कॅशबॅक मिळू शकतो. Amazon Payच्या मते, भारतातील १३ शहरांमध्ये केलेल्या संशोधनात अनेकांना योग्य आणि विचारपूर्वक भेटवस्तू निवडण्यासाठी वेळ आणि पर्यायांची अडचण असल्याचे आढळले. त्यामुळे रोख रकमेऐवजी गिफ्ट कार्ड हा अधिक वैयक्तिक आणि सोयीचा पर्याय ठरू शकतो.

रक्षाबंधनासाठी नवीन पर्सनलायझेशन वैशिष्ट्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे

फोटो अपलोड: भावंडासोबत आवडता फोटो जोडून कस्टम कार्ड तयार करा. अपलोड केलेले फोटो फक्त कार्ड पर्सनलायझेशनसाठी वापरले जातात आणि अॅमेझॉनच्या प्रायव्हसी नोटीसनुसार हाताळले जातात.
राखी-थीम असलेली अॅनिमेटेड डिझाइन्स: या सणासाठी खास क्युरेट केलेल्या सणासुदीच्या अॅनिमेटेड डिझाइन्स.
एआय-जनरेटेड डिझाइन्स: प्राप्तकर्त्याच्या (ज्याला गिफ्ट द्यायचे आहे) व्यक्तिमत्त्वाला साजेसे जेन एआयद्वारे डिझाइन केलेले व्हिज्युअल्स.

टीप: सर्व ऑफर्स आणि कॅशबॅकसाठी नियम व अटी लागू आहेत.