Amazon ही जगातील सर्वात लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट्सपैकी एक आहे. आजकाल बहुसंख्य लोक या साइटवर विविध गोष्टी खरेदी करत आहेत. पण कधी कधी अॅमेझॉनवर ऑर्डर केलेली वस्तूमध्ये दोष असल्याचे पाहायला मिळते. या Damage Products मुळे अॅमेझॉन कंपनीच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी कंपनीने Artificial Intelligence ची मदत घ्यायचे ठरवले आहे. सध्या AI टेक सर्वत्र पाहायला मिळत आहे. लोक वेगवेगळ्या ठिकाणी या तंत्राचा वापर करत आहेत. ही अशी एकूण पार्श्वभूमी असताना अॅमेझॉनने घेतलेल्या या निर्णयाने लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, सदोष गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहचू नये यासाठी ही कंपनी त्यांच्या प्रत्येक वेअरहाऊसमध्ये टेस्टिंगसाठी AI टेकचा वापर करणार आहे,
सध्या अॅमेझॉनच्या वेअरहाऊस, गोडाऊन्समध्ये ऑर्डर केलेल्या प्रोडक्ट्सची टेस्टिंग माणसांकडून करवून घेतली जात आहे. टेस्टिंग करताना अनेकदा वर्कलोड करताना Human Error येतो. अशा वेळी दोषयुक्त गोष्टी ग्राहकांकडे पोहचण्याची शक्यता असते. काही वेळेस पूर्णपणे खराब झालेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचते. माणसांकडून प्रोडक्ट्स चेक करवून घेणे एक दीर्घ प्रक्रिया आहे आणि त्यासाठी बराचसा वेळ देखील खर्च होऊ शकतो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. ही समस्या दूर व्हावी यासाठी कंपनीने टेस्टिंगसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करण्याचे ठरवले आहे.
India today ने दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन कंपनीने अमेरिका आणि युरोपमधील १० वेअरहाऊसमध्ये AI टेकचा सेटअप करायला सुरुवात केली आहे. अॅमेझॉनमध्ये काम करणारे सॉफ्टवेअर मॅनेजर ख्रिस्तोफ श्वर्टफेगर यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, हे तंत्रज्ञान माणसांपेक्षा ३ पट जास्त काम करतो. कमी वेळात या तंत्रामुळे जास्तीत जास्त काम पूर्ण होते. AI ला काम शिकवण्यासाठी अॅमेझॉनने असंख्य फोटोग्राफ्सचा वापर केला आहे. त्यामध्ये सदोष आणि दोष नसलेल्या प्रोडक्ट्सचा समावेश होता. यातून AI ला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजवण्याचा कंपनीचा प्रयत्न केला होता.
AI सेटअप –
जेव्हा एखादी व्यक्ती एक वस्तू ऑर्डर करेल, तेव्हा त्या वस्तूचे पीकिंग आणि पॅकेजिंग यांच्या दरम्यान निरीक्षण केले जाईल. जेव्हा ग्राहक ठराविक प्रोडक्ट निवडतील तेव्हा ते प्रोडक्ट एका डब्ब्यामध्ये ठेवली जाईल. हा डब्बा इमेजिंग स्टेशनवरुन पुढे पाठवण्यात येईल. या दरम्यान त्यामध्ये दोष असल्यास AI त्याची माहिती देईल. पुढे सुपरवायजर म्हणून काम करणारी व्यक्ती पुन्हा ते प्रोडक्ट तपासेल. जर खरंच त्यात काही दोष असेल, तर ते प्रोडक्ट बाजूला ठेवले जाईल. त्याला दोषरहित प्रोडक्ट Replace करेल.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon will use ai to scan product packaging in warehouse now artificial intelligence tech detect damaged product before delivery know more yps