scorecardresearch

इंटरनेट बंद असतानाही करता येणार Google Mapsचा वापर; कसं ते जाणून घ्या

गुगल मॅप हे GPS-आधारित नेव्हिगेशन प्लॅटफॉर्मपैकी एक आहे.

google maps news
Google Maps – (Image Credit- Pixabay)

Google Maps जगभरात अनेक वापरतात. त्यामुळे अनेक गोष्टी लोकांना सोप्या झाल्या आहेत. मॅप्समुळे लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे सोपे झाले आहे. गुगल मॅप हे GPS-आधारित नेव्हिगेशन प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. काही काळानंतर गूगल मॅप्सच्या विकसकांनी त्यामध्ये अनेक नवीन फीचर्स देखील समाविष्ट केली आहेत. ज्यामुळे गुगल मॅप्स लोकप्रिय झाले आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये MapMyIndia, Sygic, Waze आणि Google Maps च्या इतर काही पर्यायांनी लोकप्रियता मिळवली आहे.

मॅप्स ज्याला MapMyIndia Move नावाने ओळखले जाते. भारतामध्ये गुगल मॅप्स सर्वात लोकप्रिय असे एक माध्यम आहे. व्व्हॉईस गाईडेड नेव्हिगेशन आणि रिअल टाइम ट्रॅफिक या फीचर्सशिवाय अन्य फीचर्ससुद्धा यामध्ये येतात. ज्यात खराब झालेले स्ट्रीट लाईट्स, स्पीड ब्रेकर, खड्डे ,, साचलेले पाणी आणि इतर गोष्टी दाखवते. या प्लॅटफॉर्मच्या विकसकांनी अलीकडेच जंक्शन व्ह्यू’ नावाचे फिचर लाँच केले आहे. जे वापरकर्त्यांना फ्लायओव्हर्स किंवा रस्त्यामधील चौक फोटोच्या स्वरूपात दाखवेल ज्यामुळे वापरकर्त्याला नेव्हीगेट करण्यास मदत होईल.

हेही वाचा : Amazon Fresh वरून किराणा माल मागवत आहात; आता डिलिव्हरीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसै

Waze Navigation and Live Traffic

Waze हे एक नेव्हिगेशन अ‍ॅप आहे. ज्यामध्ये वापरकर्ते ट्रफिक अपडेट , पोलीस अलर्ट , धोक्याचे इशारे इत्यादी सर्व प्रकारचे अपडेट्स शेअर करते. लाईव्ह ट्रॅफिक डेटावर आधारित वाहतूक कोंडी असल्यास अ‍ॅप तुम्हाला तुमचा मार्ग बदलण्याचा पर्याय देतो. हे एक सर्वात वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम असे नेव्हिगेशन अ‍ॅप आहे. वापरकर्ते यावर त्यांच्या जवळील पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल आणि गॅसची किंमत देखील बघू शकतात.

Sygic GPS Navigation and Maps

Sygic चे जगभरात २०० दशलक्ष वापरकर्ते आहेत. यामध्ये तुम्हाला जगातील सर्व देशांचे ऑफलाईन स्वरूपात ३डी मॅप्स डाउनलोड करता येतात. जे मॅप इंटरनेट नसतानाही नेव्हीगेशनसाठी वापरले जाऊ शकतात. google maps प्रमाणेच Sygic तुम्हाला रिअल-टाइम ट्रॅफिक अपडेट, वेग मर्यादा तसेच पार्किंगसाठी सूचना देते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 10:40 IST