scorecardresearch

Premium

iPhone 15: ‘अ‍ॅपल’ चार्जिगचा भेदाभेद संपुष्टात; नव्या आयफोन १५ सह सर्व उत्पादनांसाठी ‘सी-टाइप’ चार्जर

Apple Wonderlust Event 2023 नवीन आयवॉचचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे हे उत्पादन टाकाऊ वस्तूंतील धातूंच्या पुनर्वापरातून बनवण्यात आले आहे.

iPhone 15 Pro Max 2
अ‍ॅपल आयफोन १५ लॉन्च

कॅलिफोर्निया : iPhone 15 Launch Today युरोपीय महासंघाने घातलेल्या अटीची पूर्तता करत ‘अ‍ॅपल’ने नव्या आयफोनमध्ये ‘सी-टाइप’ पद्धतीच्या चार्जिगचा अंतर्भाव केला आहे. त्यामुळे आता अँड्रॉइड आणि आयफोनमधील एक मोठा भेद संपुष्टात आला असून कोणत्याही ‘सी टाइप चार्जिग केबल’ने आयफोनसह अ‍ॅपलची अन्य उत्पादने चार्ज करणे शक्य होणार आहे. भारतामध्ये सुरूवातीला आयफोन-१५ची किंमत साधारणत: ६६ हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

डायनमिक आयलँड, ४८ मेगापिक्सल कॅमेरा तसेच अधिक क्षमतेची बॅटरी असलेल्या ‘आयफोन १५’च्या नव्या श्रेणीची घोषणा कुपरटिनो येथील कंपनीच्या मुख्यालयात मंगळवारी रात्री झालेल्या वार्षिक कार्यक्रमात करण्यात आली. आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो, आयवॉच सीरिज ९, आयवॉच अल्ट्रा २ आदी उत्पादनांची घोषणा यावेळी करण्यात आली. आयफोन १५ ची किंमत ७९९ डॉलर ठरवण्यात आली असून १५ प्लस ८९९ डॉलर, तर १५ प्रो ९९९ डॉलरना अमेरिकेतील बाजारात उपलब्ध होईल. हे दोन्ही फोन भारतात कधी उपलब्ध होतील, हे कंपनीने रात्री उशिरापर्यंत जाहीर केले नव्हते.

hardip singh puri
शहरे आणि नगरांच्या परिवर्तनासाठी २०१४ पासून १८ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक : हरदीप एस पुरी
vedanta group
वेदान्त समूहातील व्यवसायांचे विलगीकरण; पाच नवीन सूचिबद्ध कंपन्या उदयास येणार
justin_trudeau_and_narendra_modi
भारत-कॅनडा यांच्यातील तणावामुळे मसूर डाळ महागणार ? जाणून घ्या…
iev 3 and iev 4 electric small trucks
अवांतर : मतिमान आणि गतिमानही..

नवीन आयवॉचचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे हे उत्पादन टाकाऊ वस्तूंतील धातूंच्या पुनर्वापरातून बनवण्यात आले आहे. याद्वारे शून्य कार्बन उत्सर्जन संकल्पना अमलात आणल्याचे ‘अ‍ॅपल’ने जाहीर केले. त्याचप्रमाणे नव्या आयफोन १५मध्ये पूर्णपणे रिसायकल केलेल्या कोबाल्ट बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. अमेरिकेशी बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर चीनने आयफोनच्या वापरावर निर्बंध आणल्यामुळे आयफोनच्या विक्रीत घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या कार्यक्रमाद्वारे आयफोनची लोकप्रियता पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न अ‍ॅपलने केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Apple charging discrimination ends c type charger for all products including the new iphone 15 ysh

First published on: 13-09-2023 at 02:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×