कंपनी आयफोन १२ सीरिज फोनची करणार फ्री सर्व्हिस; कारण…

काही फोनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर कंपनीने फोनची फ्रि सर्व्हिस करण्याच निर्णय घेतला आहे.

Apple
कंपनी आयफोन १२ सीरिज फोनची करणार फ्री सर्व्हिस; कारण… (Image source: Apple)

अ‍ॅप्पलने आयफोन १२ सीरिजसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. काही फोनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर कंपनीने फोनची फ्रि सर्व्हिस करण्याच निर्णय घेतला आहे. यात आयफोन १२ आणि आयफोन १२ प्रो फोनचा समावेश आहे. आयफोन १२ आणि आयफोन १२ प्रोच्या युजर्संना आवाजाच्या समस्या येत आहेत. त्यानंतर कंपनीने हे पाऊल उचललं आहे. आयफोन १२ आणि आयफोन १२ प्रो युजर्संना काही काळापासून स्पीकरमध्ये समस्या येत होती. त्यानंतर अ‍ॅप्पलने हा निर्णय घेतला आहे. आयफोन १२ आणि आयफोन १२ प्रोच्या युजर्संना ही सेवा मिळणार आहे. ही समस्या फक्त काही उपकरणांमध्ये असल्याने तुम्हाला स्वतः अ‍ॅप्पलच्या वेबसाइटवर जाऊन तपासावे लागेल.

आयफोन १२ आणि आयफोन १२ प्रोच्या ज्या मॉडेल्सचं उत्पादन ऑक्टोबर २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान झाले आहे. याबाबत सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्याचं सांगण्यात येत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, रिसीव्हर मॉड्यूलच्या काही भागामध्ये समस्या असू शकते. तुमच्याकडेही आयफोन १२ किंवा आयफोन १२ प्रो असेल आणि स्पीकरमध्ये समस्या असल्यास, तुम्ही अ‍ॅप्पलच्या कोणत्याही अधिकृत स्टोअरला भेट देऊन तुमचा फोन मोफत दुरुस्त करून घेऊ शकता. आयफोन १२ मिनी आणि आयफोन १२ प्रो मॅक्स मॉडेल्समध्ये स्पीकरची समस्या नाही.

अ‍ॅप्पलने काही दिवसांपूर्वी सेल्फ-रिपेअर योजना जाहीर केली आहे. सेल्फ-रिपेअर योजने अंतर्गत, तुम्ही आता अ‍ॅप्पलचे स्पेअर पार्ट्स खरेदी करू शकाल आणि तुमचा आयफोन किंवा मॅकबूक स्वतःच दुरुस्त करू शकता. अ‍ॅप्पलने पहिल्यांदाच सामान्यांसाठी स्पेअर्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मॅन्युअलच्या मदतीने सुटे भाग खरेदी करणे आणि फोन किंवा लॅपटॉप दुरुस्त करणे देखील शक्य होणार आहे. अ‍ॅप्पलने म्हटले आहे की, आयफोन १२ आणि १३ चे डिस्प्ले, बॅटरी आणि कॅमेरा दुरुस्त करण्यासाठी २०० भाग आणि टूल्स उपलब्ध असतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Apple company will offer free service for iphone 12 series phones rmt

ताज्या बातम्या