Apple Wonderlust Event 2023 : अॅपल ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. कंपनीने आपल्या इव्हेंटमध्ये आयफोन १५ सिरीज आणि वॉच सिरीज ९ लॉन्च केली आहे. कंपनीने आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस या मॉडेलच्या किंमतीदेखील जाहीर केल्या आहेत.आयफोन १५ ची सुरुवातीची किंमत ७९९ डॉलर्स इतकी असणार आहे. तर आयफोन १५ प्लसची सुरुवातीची किंमत ही ८९९ डॉलर्स असणार आहे. कंपनीने आयफोन १५ प्रो आणि प्रो मॅक्स देखील सादर केले आहेत. कंपनीने आयफोन १५ प्रो मॉडेल्समध्ये अॅक्शन बटण दिले आहे. ज्याचे मदतीने वापरकर्त्यांना अनेक कामे करता येणार आहेत.