Apple Event 2024 Highlights Apple iPhone 16 Series, Apple Watch Series 10, AirPods 4 Launch : बहुचर्चित ॲपलचा ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंट काल सोमवारी स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात पार पडला; अनेकांनी तो लाईव्ह पहिला. या कार्यक्रमाला अनेक तंत्रज्ञानप्रेमींनी हजेरीसुद्धा लावली होती. ॲपलचे सीइओ टिम कूक यांच्या रेकॉर्डेड भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या इव्हेंटमध्ये ॲपल वॉच १०, आयफोन १६, आयफोन प्लस १६, आयफोन प्रो १६, आयफोन मॅक्स १६, ॲपल वॉच एसई, ॲपल वॉच अल्ट्रा २, एअरपॉड्स ४ लाँच करण्यात आले. ॲपलच्या ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटमध्ये लाँच झालेल्या प्रॉडक्ट्सची फीचर्स काय असणार, तसेच त्यांची भारतातील किंमत काय असणार आहे, त्याबद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात.

ॲपल वॉच १० (Apple Watch Series 10) :

ॲपलच्या (Apple) ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटची सुरुवात इंटेलिजन्ट ॲपल वॉचने १० ने झाली. या वॉचमध्ये तुम्हाला मोठा डिस्प्ले, स्क्रीनवरचा मजकूर वेगात वाचता यावा यासाठी स्क्रीन एरिआ ३० टक्क्यांनी वाढवला सुद्धा आहे. ॲपल वॉचवर टाइप करणेही सोप्पे होणार आहे. ॲपल वॉच १० मध्ये जेट ब्लॅक फिनिश, ॲल्युमिनियम अलॉयमधील बॉडी, आकार, रचना आणि वजन सारे काही नवीन असणार आहे. तसेच स्पीकरचा आकार ३० टक्क्यांनी कमी पण तरीही आवाज अगदी सुस्पष्ट ऐकू येईल असा आहे. सगळ्यात महत्वाचे आणि युजर्ससाठी उपयोगी असे फास्टेट चार्जिंक ॲपल वॉच ३० मिनिटांत ८० टक्के चार्जिंग करून देणार आहे. तसेच हे वॉच तुम्हाला तीन रंगीत पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे.

iPhone 15 and 14 Price cut
Apple iPhone Price in India: iPhone १६ लाँच होताच iPhone 15 आणि iPhone 14 च्या किंमती घसरल्या, जाणून घ्या नवे दर
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Iphone 16 Series Price In India Apple unveils iPhone 16 and iPhone 16 Plus, price starts from Rs 79,900 and Rs 89,900 respectively
iPhone 16 Price: प्रतीक्षा संपली! भारतात आयफोन 16 आणि 16 Plus ची किंमत किती? जाणून घ्या फीचर्ससह सर्वकाही
Apple Event 2024 Updates iPhone 16 plus launched in Marathi
Apple iPhone 16 Launch Event 2024 : नवीन लूक, डिझाइनसह आयफोन १६, ॲपल एअरपॉडस् लाँच; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Why Apple is intelligent about its use of Apple Intelligence in the new iPhone 16 series
नव्या iPhone 16मध्ये Appleने कसा केला Apple Intelligenceचा वापर? जाणून घ्या…
Govinda Hospitalized after Shooting Himself Accidently
अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी, पत्नीने दिली प्रकृतीबद्दल माहिती
(फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)

याचबरोबर ॲपल वॉच १० ला टायटॅनियम बॉडी असणार आहे. हे वॉच तुमच्या निद्रानाशाचा, तुमच्या श्वासांमधील अनियमिततेचा शोध घेण्यास मदत करणार आहे. तसेच युजर्सना वॉचमध्ये स्लीप अप्निया नोटिफिकेशनही मिळेल. त्याचबरोबर तुमची झोप किती चांगली झाली आहे, याचे विश्लेषण ॲपल वॉच एका नोटिफिकेशनमध्ये देईल. तुम्ही पाण्यात गेल्यावर तुमच्या आरोग्याचीही काळजी घेईल. या सगळ्या फीचर्सबरोबर ॲपल वॉच १० हे आजवरचे सर्वात कमी जाडीचे (थिन) वॉच ठरणार आहे.

(फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)

त्याचबरोबर ॲपल ( Apple) वॉच अल्ट्रा २ ची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे ; जे प्रामुख्याने खेळाडूंसाठी डिझाइन करण्यात आले आहे. ॲपल वॉच अल्ट्रा 2 सॅटिन ब्लॅकमध्ये स्क्रॅच प्रतिरोधक केस, पॅराशूट लॉक-इन मेकॅनिझमसह ब्लॅक टायटॅनियम बँड्ससह उपलब्ध असणार आहे. ॲपल वॉच अल्ट्रा २ ची किंमत अमेरिकन डॉलर ७९९ ($799) पासून सुरू होते आणि २० सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्धअसणार आहे.

जर तुम्ही हा लाईव्ह इव्हेंट पहिला नसेल तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर लाईव्ह ब्लॉगमधील अपडेट्स पाहू शकता

हेही वाचा….Apple iPhone 16 Launch Event 2024 : नवीन लूक, डिझाइनसह आयफोन १६, ॲपल एअरपॉडस् लाँच; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

ॲपल एअरपॉडस् ४ (Apple AirPods 4)

एअरपॉडस् ४ मध्ये चार्जिंग केस आता यूएसबी-सी ( USB-C) पोर्टसह असणार आहे. तसेच इतरांशी संवाद साधताना एअरपॉडस्चा आवाज कमी होईल आणि बोलणं संपल्यावर पुन्हा आवाज पहिल्यासारखा येईल. मशीन लर्निंगचा नवा अवतारसह एअरपॉडस् फोर ४ मध्ये आता वायरलेस चार्जिंग सुद्धा युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. तसेच सिरीला प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही ‘होय’ किंवा ‘नाही’ म्हणून तुम्ही डोकं हलवू उत्तर देऊ शकता. याचबरोबर तुम्हाला ३० तासांची बॅटरी लाईफ सुद्धा मिळणार आहे.

(फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)

एअरपॉडस् प्रो मध्ये आता हिअरिंग प्रोटेक्शन देण्यात येणार आहे; ज्यामुळे कानाच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे. एअरपॉडस् हिअरिंग एडचेही काम करणार आणि बहिरेपणा टाळण्यास मदत करणार आहे.

(फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)

आयफोन १६ (iPhone 16) :

आयफोन १६ मध्ये कस्टमाइज ॲक्शन बटन, कॅमेरा कंट्रोल बटन असणार आहे. आयफोन १६ मध्ये ए १८ नवीन चीप असेल ; जी आयफोन१५ पेक्षा ३० टक्के वेगात काम करून ऊर्जेची ३० टक्के बचतसुद्धा करेल. आयफोन १६ मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले तर देण्यात आला आहे. तसेच यात iOS 18 सह Apple Intelligence (AI) सिस्टम देण्यात आली आहे. खास गोष्ट म्हणजे आता iPhone 16 मॉडेल्स AAA गेम्सला सपोर्ट करतील. आणि दोन्ही मॉडेल्स यूएसबी टाईप-सी ( Type-C) पोर्ट सह येतात. आयफोन १६ मध्ये मोठी बॅटरीसह वेगवान चार्जिंग होणार आहे.

आयफोन१६ मध्ये प्रायव्हसी प्रॉमिस असेल ; ज्यामुळे तर थर्ड पार्टीही व्हेरिफिकेशन करू शकेल. अर्थात प्रायव्हसीची खातरजमा अगदी व्यवस्थित होईल. आयफोन १६ तुम्हाला हव्या असलेल्या फोटोच्या माध्यमातून तुमच्या आठवणींचा शोध घेण्यात मदत करेल. कारण – सिरीही एआयच्या मदतीने अधिक स्मार्ट झाला आहे. तुम्ही फक्त ॲपल इंटेलिजन्सच्या मदतीने सिरीला आदेश द्या, तो तुमचे काम काही सेकेंदात, अधिक सोप्पे करून देईल. तसेच खास गोष्ट अशी की, आयफोन१६ मधीस ॲपल इंटेलिजन्स आता जगातील अनेक भाषांमध्येही येणार आहे.

हेही वाचा….Apple iPhone 16 Launch Event 2024 : नवीन लूक, डिझाइनसह आयफोन १६, ॲपल एअरपॉडस् लाँच; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

(फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)

आयफोन १६ चा कॅमेरा (iPhone 16 Camera ) :

व्हिज्युअल इंटेलिजन्स – आयफोन १६ चा कॅमेरा अनेक गोष्टींचा शोध घेईल. लेक्चर ऐकताना काही पॉइंटस् राहिले तर आय़फोन १६चा कॅमेरा राहून गेलेले पॉइंटस् जोडण्याचेही काम करेल. म्हणजेच आयफोन १६ चा कॅमेरा हा विचार करणारा, शोध घेणारा आणि तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे मदत करणारादेखील असणार आहे.आयफोन १६ मध्ये ४८ मेगापिक्सेल कॅमेरा, नवा १२ मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा अशी सोय आहे. आजूबाजूचे अनावश्यक आवाजही व्हिडीओतून गायब होण्याची सोयही यात असून iOS 18 मध्ये इमर्जन्सीमध्ये व्हिडीओ शेअर करण्याची क्षमता असणार आहे.

(फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)

आयफोन १६ अल्ट्रामॅरिन, टील, पिंक, व्हाईट आणि ब्लॅक आदी रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचा….Apple iPhone 16 Launch Event 2024 : नवीन लूक, डिझाइनसह आयफोन १६, ॲपल एअरपॉडस् लाँच; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

ॲपल आयफोन १६ प्रो ( iPhone 16 Pro) :

तर iPhone 16 Plus मध्ये ६.७ इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ॲपल ( Apple) आयफोन १६ प्रो काळा, पांढरा, सिल्व्हर, डेजर्ट कलर पर्यायांमध्ये येईल. आतापर्यंतची सर्वोत्तम आयफोन बॅटरी लाइफ या फोनमध्ये असणार आहे. हे A18 प्रो मुळे शक्य होणारआहे. जे द्वितीय-जनरल 3 नॅनो मीटर ट्रान्झिस्टरसह तयार केले आहे, ;जे जनरेटिव्ह एआय वर्कलोड्समध्ये उत्कृष्ट काम करण्यास मदत करते. ६ कोर जीपीयू ए १८ प्रो ला ए १७ प्रोपेक्षा १५ टक्के वेगवान बनवते तर ए १७ प्रो पेक्षा २० टक्के कमी उर्जा वापरते.

ॲपल आयफोन १६ प्रो मध्ये ४८ एमपी फ्यूजन कॅमेरा, ४८ एमपी अल्ट्रा वाइड कॅमेरा, १२ एमपी ५एक्स टेलीफोटो कॅमेरा सुद्धा असणार आहे. यात 4K120 फ्रेम्स प्रति सेकंदासह सिनेमॅटिक स्लो मोशन देखील आहे. iPhone 16 Pro मध्ये चार स्टुडिओ माइक देखील आहेत. यात अधिक इमर्सिव्ह अनुभवासाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग दरम्यान ऑडिओ कॅप्चर करण्यास मदत होईल.तुम्ही लवकरच व्हॉइस मेमोमध्ये रेकॉर्डिंगच्या ठिकाणी दुसरा ट्रॅक ठेवू शकणार आहात ; युजर्सना दोन-ट्रॅकचे रेकॉर्डिंग करू देण्यासाठी हे फीचर लाँच करण्यात आले आहे.

(फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)

कार्यक्रमात लाँच झालेल्या ॲपल ( Apple) प्रोडक्टची भारतातील काय असणार किंमत ?

भारतात ॲपल (Apple) आयफोन १६ ची किंमत ७९,९०० पासून सुरू होईल. आयफोन १६ प्लसची किंमत ८९,९०० रुपयांपासून, तर आयफोन १६ प्रोची किंमत १,१९,००० रुपयांपासून सुरू होऊ शकते. तर आयफोन प्रो मॅक्सची किंमत १,४४,९०० रुपयांपासून सुरू होऊ शकते. तसेच ॲपल वॉच सिरीज १० ची किंमत ४६,९०० रुपये ॲपल वॉच एसई २४,९०० रुपये ॲपल वॉच अल्ट्रा २ ची किंमत ८९, ९०० रुपयांपासून सुरु होईल तर एअरपॉड्स ४ ची किंमत १२,९०० रुपयांपासून सुरु होणार आहे ; असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तर ही सर्व प्रोडक्टस ॲपलच्या (Apple) ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटमध्ये काल लाँच करण्यात आली आहेत…