स्मार्टफोन वापरकर्त्यांना नेहमीच अ‍ॅपल फोनचं अपडेटेड व्हर्जन आपल्याकडे असावं असं वाटतं. आयफोन १३ हा सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. मात्र फोनची किंमत आवाक्याबाहेर असल्याने अनेकदा हात आखुडता घ्यावा लागतो. त्यामुळे आयफोन वापरकर्ते किंमत कमी होण्याची वाट पाहात असतात. सप्टेंबर महिन्यात अ‍ॅपलने आयफोन १३ सीरिजचे आयफोन १३ मिनी, आयफोन १३, आयफोन १३ प्रो आणि आयफोन प्रो मॅक्स लॉन्च केले होते. आता आयफोन १३ ची किंमत कमी करण्यात आली आहे. आयफोन १३ १२८ जीबी मॉडेलची किंमत आता ५५,९९० रुपये इतकी असणार आहे.

अ‍ॅपल डिस्ट्रिब्युटरच्या अधिकृत वेबसाइट, IndiaiStore.com वर आयफोन १३ स्मार्टफोन सीरिजवर मोठी सूट आहे. तुम्हाला स्टोअरमधून आयफोन १३ खरेदी करायचा असल्यास HDFC बँक कार्डने पेमेंट करा. तुम्हाला ६००० रुपयांची सूट मिळेल. तुम्ही EMI पर्याय निवडला तरीही ही सवलत लागू असणार आहे. तसेच आपल्याकडचा जुना आयफोन विकण्याच्या चांगल्या स्थितीत असेल. तर आयस्टोरमध्ये आपल्याला १८ हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. कारण भारतात आयफोन एक्सआर ६४ जीबीची एक्सचेंज किंमत १८ हजार रुपये आहेत. दुसरीकडे, आयफोन ११ किंवा हायर मॉडेल असल्यास आपल्याला ३ हजार रुपयांचा एक्सचेंज इन्सेन्टिव मिळेल. त्यामुळे आयफोन १३ ची किंमत ५५,९९० रुपये इतकी होईल. एक्सचेंज ऑफर फक्त अ‍ॅपलच्या अधिकृत ट्रेन इन प्रोवाइडर्स Cashify आणि Servify वर लागू आहे. आयफोन मिनी, आयफोन १३ प्रो आमि आयफोन प्रो मॅक्सवरही सूट उपलब्ध आहे. आयफोन १३ मिनी (४५,९००), आयफोन १३ प्रो (९६,९००), आयफोन १३ प्रो मॅक्स (१,०६,९००) किंमत आहे.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : आता कोठे हरवली भाजपची नैतिकता?

Google Photos मध्ये नव्या एडिटिंग टूलची भर; स्काय ते पोर्टेट मोडपर्यंतचे पर्याय

आयफोन १३ २५३२x११७० पिक्सल रिजॉल्यूशनसह ६.१ इंचाच्या OLED स्क्रिनसह येतो. सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. तसेच, या फोनमध्ये एक छोटा नॉच देखील वापरण्यात आला आहे आणि हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये कंपनीने A१५ बायोनिक चिप दिली आहे आणि त्याचा प्रारंभिक वेरिएंट १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो. आयफोन १३ प्रो स्मार्टफोनमध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याला LTPO Apple Pro Motion 120hz सुपर रेटिना XDR पॅनेल देण्यात आला आहे. आयफोन १३ प्रो मॅक्स या वर्षी लॉन्च होणारा टॉप एंड व्हेरिएंट आहे. यामध्ये मध्ये ६.७ इंचाची सुपर रेटिना XDR स्क्रीन आहे, जी Pro Motion 120hz सह येते.