Apple iPhone 14 सीरीजशी संबंधित माहिती गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने समोर येत आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये iPhone 14 मालिका लॉंच होईल अशी अपेक्षा आहे. क्युपर्टिनो-आधारित अ‍ॅपल कंपनी सहसा याच सीझनमध्ये त्यांची नवीन मालिका लॉंच करत असते. पण चीन-तैवान संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याने अ‍ॅपलच्या स्मार्टफोन उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. एका सुप्रसिद्ध टिपस्टरचा दावा आहे की Apple iPhone 14 सीरीज अपेक्षेपेक्षा लवकर लॉंच केली जाऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Tipster Max Weinbach च्या म्हणण्यानुसार, Apple कंपनी येत्या ६ सप्टेंबर रोजी आपला पुढचा आयफोन लॉंच करेल. ही लॉंचची तारीख बरोबर सिद्ध होऊ शकते. कारण Apple सहसा मंगळवारी आणि सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात इव्हेंट आयोजित करत असते. याशिवाय अ‍ॅपलशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, नवीन Apple iPhone ची विक्री १६ सप्टेंबरपासून सुरू होईल. याआधी बातम्या आल्या होत्या की, नवीन iPhone 14 सीरीज १३ सप्टेंबरला लॉंच होईल. Apple ने अद्याप अधिकृत लॉंचची तारीख उघड केलेली नाही, परंतु कंपनी येत्या काही दिवसात लॉंचशी संबंधित माहिती शेअर करू शकते.

आणखी वाचा : Vivo V25 Pro लवकरच भारतात एंट्री करणार, लॉंचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक

वृत्तानुसार, चीन आयफोन निर्माता पेगाट्रॉनची तैवानमधून होणारी शिपमेंट रोखत आहे. तैवानमधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर तैवान, चीन किंवा चायनीज तैपेई असे लेबल लावावे, अशी चीनची इच्छा आहे. चीनचे म्हणणे आहे की, तैवान हा त्याच्या भूभागाचा भाग आहे, त्यामुळे वस्तूंवर तैवान किंवा रिपब्लिक ऑफ चायनाऐवजी चीनचे नाव असावे.

आयफोनचे उत्पादन भारतात लवकरच सुरू होणार
प्रख्यात विश्लेषक मिंग-ची-कुओ यांनी उघड केले आहे की Apple भारतात तसेच चीनमध्ये iPhone 14 मॉडेलचे उत्पादन करण्याची तयारी करत आहे. भारतातील उत्पादन जागतिक बाजारपेठेची मागणी पूर्ण करणार नाही, तर भारतीय बाजारपेठेची गरज भागवेल, असे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय अशी बातमी आहे की, अ‍ॅपलने स्वतःच्या पुरवठादाराला आधी चीनच्या गरजा पूर्ण करण्यास सांगितले आहे. आता हे पाहणे बाकी आहे की अ‍ॅपल प्रत्येक वर्षीप्रमाणे या वेळी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आपल्या नवीन आयफोन 14 सीरीजचे लॉंचींग कसं व्यवस्थापित करेल. गेल्या वर्षी कंपनीने मंगळवारी, १४ सप्टेंबर रोजी नवीन सीरीजचे अनावरण केले होते.

आणखी वाचा : डब्बा टीव्हीचा काळ गेला! OnePlus, Redmi, LG कडून स्मार्ट टीव्हीवर ६०%पर्यंत डिस्काउंट

iPhone 14 series
Apple iPhone 14 सीरीजमध्ये ४ नवीन डिव्हाईस लॉंच केली जाऊ शकतात. यामध्ये iPhone 14, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max यांचा समावेश आहे. याशिवाय कंपनी मिनी व्हर्जनऐवजी नवीन iPhone 14 Max मॉडेल आणू शकते. नियमित मॉडेलमध्ये मागील वर्षीचा Apple A15 चिपसेट असू शकतो. तसंच प्रो मॉडेलमध्ये नवीन A16 चिपसेट दिला जाऊ शकतो. प्रो व्हेरिएंटमध्ये ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल. दुसरीकडे जुना कॅमेरा सेटअप स्टॅंडर्ट वर्जनमध्ये उपलब्ध असेल. iPhone 14 आणि iPhone 14 Pro Max मध्ये पंच-होल डिस्प्ले डिझाइन असू शकते.

आयफोन १४ सीरीजबद्दल असे वृत्त आहे की ते मागील आयफोन १३ सीरीजपेक्षा १० हजार रुपयांनी अधिक महाग असेल. पण नुकत्याच आलेल्या एका अहवालातून समोर आले आहे की, Apple नवीन सीरिजच्या किमतीत वाढ करणार नाही. iPhone 13 ची सुरुवातीची किंमत ७९,९९० रुपये आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple iphone 14 launch date 6 september tipped may launch earlier due to taiwan china tension prp
First published on: 08-08-2022 at 21:33 IST