scorecardresearch

Premium

iPhone 15 खरेदी करणं बजेटच्या बाहेर जातंय? आयफोन १३ आणि १४ वर ‘या’ ठिकाणी मिळतोय एक्सचेंज बोनस

आयफोन १५ सिरीजमध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे.

amazon and flipkart many deals on iphone 13 and 14 models
आयफोन १५ सिरीजची विक्री भारतात सुरु झाली आहे.(Image Creit-Apple)

अ‍ॅपल कंपनीने १२ सप्टेंबर रोजी आपली बहुप्रतीक्षित अशी आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. या आयफोन १५ सिरीजमध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. आयफोन १५ सिरीजची विक्री २२ तारखेपासून सुरु झाली आहे. Apple च्या अनेक चाहत्यांनी आयफोन १५ सिरीजमधील मॉडेल्सची खरेदी केली आहे. मुंबई आणि दिल्लीमधील कंपनीच्या अधिकृत स्टोअर्सबाहेर ग्राहकांनी आदल्या दिवसापासूनच गर्दी केली होती. मात्र अनेकांना महागडे हँडसेट त्यांच्या बजेटमुळे खरेदी करणे शक्य होत नाही. यामुळे ग्राहकांचे लक्ष आयफोन १४, आयफोन १४ प्रो मॅक्स आणि आयफोन १३ सह जुन्या मॉडेल्सकडे वळले आहे. आज आपण जुन्या आयफोन मॉडेल्सच्या किंमती व त्यावरील ऑफर्स जाणून घेउयात.

आयफोन 14

सध्या आयफोन १४ Amazon वरती ६२,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. तुम्हाला या डिव्हाइसवर ३७,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Buy google pixel 7a rupees 4,700 rs flipkart big billion days sale
४,७०० रुपयांमध्ये खरेदी करा Google Pixel 7a; ‘या’ प्लॅटफॉर्मवर मिळतेय आकर्षक ऑफर, एकदा पाहाच
Google Pixel 8 series listed on Flipkart
VIDEO: ४ ऑक्टोबरला लॉन्च होणार गुगल Pixel 8 सिरीज; ५० मेगापिक्सलसह मिळणार…, एकदा पाहाच
iphone 15 sale today in india with massive discount
iPhone 15 Series Sale In India: भारतात आजपासून विक्रीला सुरूवात; झटपट कॅशबॅकसह मिळणार…, फीचर्स एकदा बघाच
iphone 15 series india price comparsion to usa dubai and china
अमेरिका, दुबई, जपानपेक्षा iPhone 15 Series भारतात स्वस्त आहे की महाग? जाणून घ्या किंमत

हेही वाचा : एअरटेलच्या ‘या’ दोन प्लॅन्समध्ये युजर्सना मिळणार Wynk म्युझिक प्रीमियमचे मोफत सबस्क्रिप्शन

आयफोन 13

आयफोन १३ सध्या फ्लिपकार्टवर ५२,४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला याफोन १३ च्या खरेदीवर ३०,६०० रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. आयफोन १३ सध्या Amazon वर उपलब्ध नाही आहे.

आयफोन 14 Pro  

आयफोन १४ प्रो Amazon आणि फ्लिपकार्टवर १,१९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये उपलब्ध आहे. तथापि, Amazon आयफोन १४ प्रो वर ३७,५०० रुपयांचा आणि फ्लिपकार्टवर ३०,५०० रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. जर का तुम्ही एक्सचेंज ऑफरसह आयफोन १४ प्रो खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दोन्ही वेबसाइट्सवर तुमच्या जुन्या फोनची किंमत तपासून घ्यावी.

हेही वाचा : रिलायन्स जिओच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळते ३३६ दिवसांची वैधता; जिओ सिनेमासह वापरकर्त्यांना मिळणार…

आयफोन १४ प्रो मॅक्स

आयफोन १४ प्रो प्रमाणेच आयफोन १४ प्रो मॅक्स मॉडेल देखील फ्लिपकार्ट आणि Amazon वर एक सारख्याच किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. दोन्ही वेबसाइट्सवर आयफोन १४ प्रो मॅक्स १,२७,९९९ रुपयांच्या किंमतीमध्ये उपलब्ध आहे. मात्र या दोन्ही साइट्सवर वेगवेगळ्या एक्सचेंज बोनस ऑफरमध्ये उपलब्ध असणार आहे. Amazon वर ३७,५०० रुपयांचा बोनस मिळेल तर फ्लिपकार्टवर ३०,५०० रुपयांचा बोनस मिळू मिळेल.

आयफोन १५ सिरीजची भारतातील किंमत

आयफोन १५, आयफोन १५ प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॉडेल्स सध्या अनुक्रमे ७९,९०० रुपये, ८९,९०० रुपये, १,३४,९०० रुपये आणि १,५९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहेत. अधिकृत Apple स्टोअरवर खरेदीदार आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस मॉडेलवर HDFC बँकेच्या कार्डच्या माध्यमातून ५ हजारांचा झटपट डिस्काउंट मिळवू शकतात. आयफोन १५ प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेलवर HDFC बँकेच्या कार्डवर ६ हजारांचा झटपट डिस्काउंट उपलब्ध आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Apple iphone 15 models out of budget iphone 14 pro iphone 13 amazon and flipkart chek all deals and offers tmb 01

First published on: 29-09-2023 at 15:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×