जगातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, अॅपलचे नाव सर्वात आधी घेतले जाईल. दरवर्षी अॅपल आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचे नवीन मॉडेल्स, iPhones लाँच करते. बातमीनुसार, पुढील महिन्यात म्हणजेच मार्च २०२२ मध्ये अॅपल आपला सर्वात स्वस्त ५जी आयफोन ( 5G iPhone) लाँच करणार आहे. आयफोन एसई ३ (iPhone SE 3) कधी आणि कोणत्या किंमतीला लॉन्च केला जाऊ शकतो ते जाणून घेऊयात…

अॅपलच्या सर्वात स्वस्त ५जी आयफोन वर मोठा खुलासा

इन्व्हेस्टर्स बिझनेस डेली मधील एका अहवालात लूप कॅपिटल मार्केट्सचे विश्लेषक जॉन डोनोव्हन यांनी सांगितले आहे की, त्यांनी काही बातम्या ऐकल्या आहेत. ज्यात अॅपलच्या नवीन ५जी आयफोन, आयफोन एसई ३ ची किंमत अंदाजे २२,५१७ रुपये इतकी असू शकते. दरम्यान या आयफोनच्या मागील मॉडेलपेक्षा हे खूपच कमी आहे कारण आयफोन एसई २ जवळपास २९,९४७ रुपयांपासून विक्री सुरू झाली होती.

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
March 2024, March 2024 Records Hottest Temperatures, March 2024 Records Hottest in 175 Years, hottes march 2024 globally, Global Average Temperatures Up by 1.35°C, heat, summer march, summer season
यंदाचा मार्च आजवरचा सर्वांत उष्ण; पश्चिमी झंझावाताचा भारताला दिलासा
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?

अॅपलने आयफोन एसई ३ ची किंमत कमी का केली?

अहवालात असे म्हटले आहे की अॅपलने आपल्या आयफोन एसई ३ ची किंमत कमी करण्यामागे एक मोठे कारण आहे. डिसेंबर २०२१ मध्ये, JPMorgan च्या विश्लेषकांनी असा अंदाज लावला आहे की अॅपल हा नवीन आयफोन लाँच करून अधिकाधिक अँड्रॉइड वापकर्त्यांना त्यांच्याकडील अॅपल वापरकर्ते बनवू इच्छित आहेत.

या दिवशी लॉंच केला जाऊ शकतो

अॅपलकडून या आयफोनबद्दलकोणतीही माहिती आलेली नसली तरी या स्मार्टफोनबद्दल अनेक गोष्टी लीक आणि टिप्सच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. अनेक रिपोर्ट्सनुसार आयफोन एसई ३ अॅपल (Apple) च्या वार्षिक स्प्रिंग लॉंच कार्यक्रमात लॉंच केला जाऊ शकतो. अॅपलचा हा स्प्रिंग इव्हेंट ८ मार्च २०२२ रोजी सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

आयफोन एसई ३ (२०२२) च्या फीचर्सबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही, पण लिक झालेल्या माहितीनुसार आयफोन कंपनीच्या लेटेस्ट A15 Bionic चिपवर हा आयफोन काम करू शकतो, ज्यावर आयफोन १३ ही सीरीज काम करते. त्याची रचना आयफोन एसई २ (२०२०) सारखीच असेल आणि तुम्हाला त्यात स्टँन्डर्ड टच आयडी, ग्लास फ्रंट आणि अॅल्युमिनियम फ्रेम मिळू शकेल.