अ‍ॅपलने अलिकडेच आयफोन १४ सिरीज लाँच केली आहे. या सिरिजमधील आयोफोन्सना लोकांची पसंती मिळत आहे. आता अ‍ॅपल पुढील पिढीच्या iphone se च्या निर्मितीकडे वळला असल्याची चर्चा आहे. या मॉडेल्सना आयफोन एसई ४ असे देखील संबोधले जाते. हा आयफोन अनेक फीचर आणि बदलांसह ग्राहकांपुढे सादर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, अ‍ॅपल iphone se चे डिझाईन बदलण्याची पुरेपूर शक्यता आहे. जुन्या एसई मॉडेल्स विशेषत: पहिल्या ते तिसऱ्या पिढीच्या मॉडेल्सना जाड बेझेल डिझाईन देण्यात आले होते. मात्र, एसई फोनला नवे डिझाईन दिल्यास ते मोठे बदल असणार आहे.

आयफोन एसई ४ बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या फोनमध्ये मोठे बदल होणार असल्याची माहिती काही लिक्समधून पुढे आली आहे. आयफोन एसई ४ बाबतच्या लिक्सनी अ‍ॅपलच्या चाहत्यांची उत्सुक्ता शिगेला पोहोचली आहे. आतापर्यंत या फोनबाबत काय माहिती पुढे आली आहे, याबाबत जाणून घेऊया.

(5G इंटरनेटबाबत मोठा खुलासा, JIO आणि AIRTEL देत आहेत इतकी डाऊनलोड स्पिड, कुणाची सेवा घ्यायची? तुम्हीच ठरवा)

iPhone SE 4 बाबतचे हे लिक चर्चेत

आयफोन एसई ४ च्या डिझाईमध्ये आणि वैशिष्ट्यांमध्ये मोठे बदल होणार असल्याची चर्चा आहे. तसेच या फोनची किंमत देखील मोठी असण्याची शक्यता लिकमधून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच आयफोन एसई ४ हा आयफोन मिनीची जागा घेणार असल्याचे देखील काही अहवालांतून समोर आले आहे. आयफोन मिनी मॉडेल हे कॉम्पॅक्ट डिझाईनसह ग्राहकांसाठी उपलब्ध आहे, मात्र त्याची विक्री घटल्याने त्यांची निर्मिती बंद झाली आहे.

iPhone SE 4 मध्ये मिळू शकतात हे फीचर

डीएससीसी (डिस्प्ले सप्लाय चेन कन्सल्टंट) विश्लेषक रोस यंग यांनी मॅकरुमर्सच्या माध्मातून काही खुलासे केले आहेत. त्यांनी आयफोन एसई ४ मध्ये ६.१ इंचची मोठी एलसीडी स्क्रिन मिळणार असल्याचा खुलासा केला आहे. तर एका लिकनुसार, फोनचे डिझाईन iphone xr पासून प्रेरित असेल. या फोनची बॉडी आयफोन १३, १४ पेक्षा किंचित मोठी आहे. नव्या आयफोन एसईला ए १५ बायोनिक किंवा ए १६ बायोनिक चिपसेटसह ही बॉडी मिळण्याची शक्यता आहे.

(IRCTC : एका पीएनआरवर अनेकांचं तिकीट काढलंय? त्यातील एकाचं तिकीट रद्द करण्यासाठी ‘हे’ करा, अडचणीत ठरते फायदेशीर)

तसेच काही अहवालांमध्ये आयफोन एसई ४ च्या पावर बटनमध्ये टच आयडी सेन्सर मिळणार असल्याचा दावा देखील केला जात आहे. फोनमध्ये ट्रू डेप्थ कॅमेरा, सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी मिळणार की नाही हे अध्याप अस्पष्ट आहे. दरम्यान या फोनबाबत अ‍ॅपलकडून स्पष्टीकरण मिळालेले नाही. त्यामुळे, आता हा फोन लाँच झाल्यावरच काय खरे आणि काय खोटे हे कळणार आहे.