Apple iphone ultra 15 price leak : अ‍ॅपलने या वर्षी बहुप्रतीक्षित आयफोन १४ सिरीज लाँच केली. लाँच होऊन ५ महिने देखील झालेले नसताना अ‍ॅपल १५ बाबत नेटकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. फोनच्या डिजाईनमध्ये काही बदल होणार की, काही नवे फीचर्स मिळणार, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

सॅमसंगने आधीच फोल्डेबल फोनवरून अ‍ॅपलला आपल्या जाहिरातीतून ट्रोल केले आहे. त्यानंतर सॅमसंगला प्रत्युत्तर म्हणून अ‍ॅपलच्या नव्या फोनमध्ये हे तंत्रज्ञान असणार का? असा देखील प्रश्न निर्माण होत आहे. इंटरनेटवर आयफोन १५ बाबत अनेक अफवा झपाट्याने पुढे येत आहेत. आता या फोनच्या किंमतीविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे.

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
my portfolio, small cap fund
‘माझा पोर्टफोलियो’ : स्मॉल आणि मिडकॅपमधील अस्थिरतेची झळ, पहिला त्रैमासिक आढावा- २०२४

इंडस्ट्री इन्साइडर लिक्सअ‍ॅपप्रोने अ‍ॅपल १५ अल्ट्राच्या किंमतीबाबत खुलासा केला आहे. आयफोन १५ अल्ट्राचे उत्पादन खर्च आयफोन १५ पेक्षा अधिक असेल, असे या ट्विटमधून सांगण्यात आले आहे. टिप्सटरने फोनची किंमत जाहीर केली नाही. मात्र, उत्पादनाबाबत दिलेल्या माहितीवरून फोनची किंमत आयफोन १४ पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

(तक्रारी काही संपेना; आता ‘या’ समस्या दूर करण्यासाठी अ‍ॅपल लाँच करणार १६.१.१ अपडेट)

आयफोन १४ प्रो मॅक्सच्या हाय एंड मॉडेलची किंमत १ लाख ८९ हजार ९०० रुपये आहे. आयफोन १५ अल्ट्रा यापेक्षाही अधिक किंमतीचा असेल, असे ट्विटवरील माहितीवरून स्पष्ट होते. किंमत २ लाखांच्यावर जाण्याची शक्यता आहे.

फीचर्स

केवळ किंमतच नव्हे तर, फोनबाबत इतर माहितीही लिक झाली आहे. आयफोन १५ अल्ट्रा हा नवा मॉडेल आयफोन १५ सिरीज अंतर्गत लाँच होईल आणि तो अलिकडेच लाँच झालेल्या आयफोन १४ प्रो मॅक्सची जागा घेणार असल्याचे समोर आले आहे. १५ सिरीज आयफोन १५, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्लस या नव्या आयफोन्ससह ग्राहकांसाठी सादर करण्यात येईल.

फोनच्या बॉडीमध्ये बदल

आयफोन १५ अल्ट्रा प्रिमियम टायटेनियम बॉडीसह मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. टायटेनियम बॉडी मिळाल्यास आयफोन १५ अल्ट्राला प्रिमियम फिल मिळेल. स्टिलच्या तुलनेत टायटेनियम आयफोनला हल्के आणि बळकट करेल आणि स्क्रॅच रेझिस्टेंट देखील करेल.

रिलायन्स जिओने 5G सेवेचा केला विस्तार; ‘या’ दोन शहरांमध्ये सुरू केली सेवा

फोनमध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा मिळणार असल्याचे सांगितल्या जाते. अ‍ॅपलने आयफोनसाठी यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट स्वीकरण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आयफोन १५ सिरीजमध्ये यूएसबी सी मिळण्याची शक्यता आहे. आयफोन १५ प्रो आणि १५ अल्ट्रा या दोन्ही आयफोनमध्ये मगील सिरीजच्या फोनपेक्षा अधिक रॅम ऑफर करेल अशी अपेक्षा आहे.

१५ सिरीजमध्ये कंपनी स्वत:चे मॉडेम देणार अशी अपेक्षा होती, मात्र ब्लुमबर्गच्या अहवालानुसार, अ‍ॅपलच्या पुढील पिढीतील बहुतांष मॉडेल्सना ५ जी मॉडेम देत राहणार, अशी पुष्टी क्वालकॉमकडून करण्यात आली आहे. त्यामुळे, क्वालकॉमच मॉडेम देण्याची शक्यता आहे.