Apple त्यांच्या मॅक या कॉम्प्युटरमध्ये टचस्क्रीन हे तंत्रज्ञान जोडण्याचे काम करत आहे. अ‍ॅपलचे इंजिनिअर्स या प्रकल्पामध्ये सक्रियपणे गुंतलेले आहेत. ही कंपनी टच-स्क्रीन मॅक तयार करण्याचा गंभीरपणे विचार करत आहे व त्यावर काम करत आहे. अजून अंतिम परीक्षण झाले नसून, याबाबद्दलचे प्लॅन बदलू शकतात. लॅपटॉपवर टच स्क्रीन नीट काम करत नसून टच इंटरफेस हवा असल्यास iPad हा एक चांगला पर्याय आहे असा युक्तिवाद कंपनीने केला होता. कारण मॅक टच स्क्रीन झाल्यास आयपॅडच्या विक्रीवर परिणाम करू शकतात अशी भीती अ‍ॅपलला आहे.

मात्र प्रतिस्पर्ध्यांनी मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटर आणि लॅपटॉप्स टच स्क्रीन केल्यामुळे अ‍ॅपलवरसुद्धा तेच करण्यासाठी दबाव येत आहे. २०२५ मध्ये कंपनी मॅकबुक प्रोचे अपडेट म्हणून आपला पहिला टच स्क्रीन मॅक लाँच करू शकते. हा प्लॅन खासगी स्वरूपाचा आहे. यावर बोलण्यास अ‍ॅपलच्या प्रतिनिधीने करण्यास नकार दिला. मॅकबुक प्रो रिव्हॅम्पचा एक भाग म्हणून अ‍ॅपल त्याचे डिस्प्ले ऑरगॅनिक लाईट किंवा ओएलईडी तंत्रज्ञानावर हलवू शकते.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य

हेही वाचा : प्रतीक्षा संपली! भारतात आजपासून Samsung Galaxy F04च्या विक्रीला होणार सुरुवात; जाणून घ्या फीचर्स

मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जॉब्सचे उत्तराधिकारी, टिम कुक यांनी अलीकडच्या काही वर्षांत ही भूमिका कायम ठेवली. २०१२ मध्ये त्यांनी सांगितले की मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने टॅब्लेट्स आणि लॅपटॉपचे मिश्रण करणे हे रेफ्रिजरेटरसह टोस्टर एकत्र करण्यासारखे आहे. परंतु Appleने इतर क्षेत्रांमध्ये उलट मार्ग काढला आहे. जॉब्सने असेही सांगितले की Apple फोन किंवा टॅबलेट विकणार नाही आणि तेच कंपनीसाठी महत्त्वाचे व्यवसाय बनले.Apple चे परिस्पर्धी असणारे म्हणजे डेल टेक्नॉलॉजी , एचपी, मायक्रोसॉफ्ट , लेनोव्हो ग्रुप लिमिटेड, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी, Acer असा कंपन्या टच स्क्रीनच्या स्पर्धेत पुढे निघून गेले आहेत.