Apple ने आपल्या कालच्या किनोटमध्ये नवीन मॅक डिव्हाईस, iOS १७ चे अपडेट WatchOs सह अनेक नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च केले आहेत. Apple WWDC २०२३ इव्हेंटमध्ये त्यांचा पहिला मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट लॉन्च केला आहे. याला ‘अ‍ॅपल व्हिजन प्रो’ असे नाव देण्यात आले आहे.

हा हेडसेट डोक्यात घातल्यावर आणि डोळ्यांवर घातल्यावर वापरकर्त्यांसमोर एक स्क्रीन सादर करतो. ज्यामध्ये प्रत्येक लहान मोठे काम केले जाते. मनोरंजन ते गेमिंगपर्यंत यामध्ये चांगला अनुभव मिळतो. ‘व्हिजन प्रो’ ला, डोळे हात आणि आवाजाने नियंत्रित केले जाऊ शकते असे कंपनीचे म्हणणे आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
DRDO ACEM Nashik Recuritment 2024
DRDO ACEM नाशिकद्वारे अप्रेंटिसच्या पदासाठी होणार भरती! ३० एप्रिलपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
elder woman dancing on gulabi sadi viral video
‘गुलाबी साडी अन् लाली लाल लाल’ ट्रेंडवर आजीबाईंनी केला भन्नाट डान्स; पाहा हा व्हायरल Video….
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

हेही वाचा : Apple WWDC 2023 : अ‍ॅपलने Mixed Reality हेडसेट, iOS 17 सह लॉन्च केले ‘हे’ जबरदस्त प्रॉडक्ट्स, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Apple Vision Pro

Apple ने जेव्हा व्हिजन प्रो ची घोषणा ऐकली तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या माध्यमांना कंपनीने आश्चर्यचकित केले. यामधले Eyesight हे एक असे फिचर आहे जे कोणी हे व्हिजन प्रो डोळ्यांवर हेडसेट घालते. तेव्हा ज्याने कोणी हे घातले आहे त्याच्यासह खोलीमध्ये कोणी आहे का हे शोधण्यासाठी डिव्हाईसच्या चारही बाजूंनी कॅमेरा सेन्सरचा वापर करते.

‘व्हिजन प्रो’ मध्ये अनेक फीचर्स आहेत. दृश्य स्पष्टपणे दिसण्यासाठी मायक्रो OLED डिस्प्ले , पॉवरसाठी M 2 चिप आणि हाताचे इशारे आणि नियंत्रणासाठी आवाजासह काम करेल असे अनेक कॅमेरे, सेन्सर आणि मायक्रोफोन यामध्ये मिळतात. वापरकर्ते व्हिजन प्रो मध्ये काही कामासाठी कीबोर्ड आणि माउसचा देखील वापर करू शकता. व्हिजन प्रो बायोमेट्रिकसाठी तुमच्या डोळ्यांमधील रेटिना स्कॅन करण्यासाठी ऑप्टिक आयडीचा वापर करते आणि तुम्हाला हेडसेटमध्ये लॉग इन करता येते. हे सर्व VisionOS सह काम करते.

हेही वाचा : Apple WWDC 2023: अ‍ॅपलने MacBook Air लॉन्च करताच ‘या’ महागड्या लॅपटॉपच्या किंमतीत केला बदल, जाणून घ्या नवी किंमत

‘व्हीजन प्रो’ ची किंमत

Apple ‘व्हिजन प्रो’ ची किंमत $३,४९९ (अंदाजे २,८८,७०० रुपये) मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या हे प्रॉडक्ट्स बाजारात उपलब्ध असणाऱ्या हेडसेटपेक्षा थोडे अधिक महाग आहे. २०२४ च्या सुरूवातीपासून हे वापरकर्त्यांना विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते.