अ‍ॅपल ही एक तंत्रज्ञान कंपनी आहे. तसेच ही कंपनी लॅपटॉप, आयफोन,स्पीकर , हेडफोन अशा अनेक प्रकारच्या डिव्हाइसचे उत्पादन करते. याच कंपनीने आता १४ आणि १६ इंचाचे दोन मॅकबुक प्रो लाँच केले आहेत. हे दोन्ही मॅकबुक नवीन प्रोसेसरने अपडेट करण्यात आले आहेत. M2 Pro आणि M2 Max असे लाँच झालेल्या दोन मॅकबुकची नावे आहेत. यामध्ये वेगवान आणि स्मूथ कनेक्टिव्हिटी युजर्सना बघायला मिळते. या मॅकबुक प्रो युजर्सना खूप काही फीचर्स देतात . या मॅकबुकबद्दल आपण मुख्य १० गोष्टी जाणून घेऊयात.

डिझाईनमध्ये कोणताही बदल नाही

Apple कंपनीने MacBook Pro च्या डिझाईनमध्ये कोणताही बदल केलेला नाही आहे. यामध्ये २०१२१ साली काही बदल करण्यात आले होते. मात्र ते आणि आताचे नवीन मॅकबुक हे सारखेच दिसतात. हे लॅपटॉप १४ आणि १६ इंच या साईझमध्ये येतात.

boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
New Tax System, New Tax System Criteria, tax deduction, tax pay, Home Loan tax deduction, Tax Regime, New Tax System, finance article, tax article, marathi finance articles,
करावे कर समाधान : नवीन करप्रणाली निवडण्याचे निकष
rbi 200 currency notes
RBI Alert: १ एप्रिलला २००० च्या नोटा स्वीकारणार नाही, आरबीआयनं केलं जाहीर!
71 Kg Weight Loss In Two Years By CEO Dhruv Agrawal Diet Plan Exercise Routine
७१ किलो वजन दोन वर्षांत कमी करताना प्रसिद्ध सीईओने पाळलं ‘हे’ डाएट; पुन्हा वजन वाढू नये याचं सिक्रेटही सांगितलं

हेही वाचा : Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्ट १0 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार? सत्या नडेला यांचा ईमेल; म्हणाले, “हा काळ…”

Apple कंपनीने लाँच केलेले हे दोन मॅकबुक प्रो दोन रंगांमध्ये येतात. नवीन मॅकबुक प्रो हे सिल्व्हर आणि स्पेस ग्रे या दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

१४ आणि १६ इंचाचे असणारे या दोन मॅकबुक प्रो मध्ये M2 Pro प्रोसेसर येतो. हे मॅकबुक प्रो तसेच १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजच्या बेस मॉडेलपासून सुरु होतात. यामध्ये ९६ जीबी रॅम आणि ८ टीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकते.

अ‍ॅपल कंपनीच्या मते या मॅकबुक प्रो चे प्रोसेसर अशा गोष्टी करू शकतात जे विंडोज पीसी करू शकत नाही. या दोन प्रोसेसरमुळे MacBook Pro चा परफॉर्मन्स आणि बॅटरीचे आयुष्य सुधारते.

हेही वाचा : Amazon Republic Day Sale: HP पासून Lenovo पर्यंत ‘या’ लॅपटॉपवर मिळतेय भरघोस सूट; जाणून घ्या काय आहेत फीचर्स

अ‍ॅपल कंपनीच्या मते या मॅकबुक प्रो चे प्रोसेसर अशा गोष्टी करू शकतात जे विंडोज पीसी करू शकत नाही. या दोन प्रोसेसरमुळे MacBook Pro चा परफॉर्मन्स आणि बॅटरीचे आयुष्य सुधारते.

या मॅकबुक प्रो मध्ये एक SDXC कार्ड स्लॉट, एक HDMI पोर्ट, ३.५ मिमीचे हेडफोन जॅक , चार्जिंग करण्यासाठी MagSafe 3 पोर्ट आणि यूएसबी पोर्ट फीचर्स बघायला मिळतात.१४ इंची मॅकबुक एम २ प्रो हे मॉडेल एकदा चार्ज केले की, याची बॅटरी १८ तास चालते. तर M2 Max हा मॅकबुक एकदा चार्ज केला की याची बॅटरी २२ तासांपर्यंत चालते.

हेही वाचा : मोठी बातमी! OnePlus Nord CE 3चे फीचर्स झाले लीक, इतक्या मेगापिक्सलचा असणार कॅमेरा

१४ इंचाच्या मॅकबुकमध्ये ६७ वॅटचा चार्जिंग सपोर्ट येतो. तर १६ इंचाच्या मॅकबुकमध्ये ९६ वॅटचा चार्जिंग सपोर्ट येतो.

काय असणार किंमत ?

१४ इंचाचा असणाऱ्या मॅकबुकची किंमत १,९९,९०० रुपयांपासून सुरु होते. तर एम २ प्रोसेसर असलेल्या व्हेरिएंटची किंमत २,४९ ,९०० रुपयांपासून सुरु होते. तसेच १४ इंचाच्या MacBook Pro ची किंमत ३,०९,९०० रुपयांपासून सुरू होते.

M2 Pro प्रोसेसर असणाऱ्या १६ इंची व्हेरिएंटची किंमत २,४९,९०० रुपयांपासून सुरु होते. तर M2 Max प्रोसेसर असणाऱ्या मॅकबुकची किंमत ३,४९,९०० रुपयांपासून सुरु होते.

MacBook Pro हे M2 Pro आणि M2 Max मॉडेल्स भारतासह २७ देश आणि प्रदेशांमध्ये Apple च्या ऑनलाइन स्टोअरवर ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध आहेत. २४ जानेवारी पासून ऑर्डर केलेले मॉडेल ग्राहकांना मिळणार आहे.