Apple ची पुरवठादार Foxconn कंपनीला एअरपॉड्स तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. फॉक्सकॉन हा जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स कॉन्ट्रॅक्टर आहे, जो ७०% आयफोन बनवतो. आता कंपनीला प्रथमच एअरपॉडचे कंत्राट मिळाले आहे. एअरपॉड्स हे सहसा चिनी उत्पादकांद्वारे बनवले जातात. Foxconn Airpods तयार करण्यासाठी तेलंगणात एक प्लांट उभारणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फॉक्सकॉन ही कंपनी या निमित्ताने भारतामध्ये $२०० दशलक्ष म्हणजेच सुमारे १,६५५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. फॉक्सकॉन कंपनीसह Wistron Corp आणि Pegatron Corp सारख्या कंपन्या देखील भारतात Apple ची उत्पादने तयार करत आहेत. फॉक्सकॉनच्या नवीन प्लांटमधील उत्पादन हे २०२४ च्या अखेरीस सुरु होऊ शकते. यासाठी कंपनी भारतात इअरफोन्स तयार करण्यासाठी भारतामध्ये कारखाना तयात करण्याची योजना तयार करत आहे. याच्याशी संबंधित दोन लोकांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात Foxconn करणार मोठी गुंतवणूक; १ लाख नोकऱ्यांची होणार निर्मिती

या प्रोजेक्टची माहिती अद्याप सार्वजनिकरित्या समोर न आल्यामुळे नाव प्रसिद्ध न करण्याच्या विनंती करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांनी डिव्हाइस बनवताना तुलनेने कमी नफ्याच्या मार्जिनमुळे एअरपॉड्स एकत्र करायचे की नाही याबद्दल अंतर्गत वादविवाद केला होता. मात्र शेवट चांगला करण्यासाठी करारासह पुढे जाण्याच्या पर्याय निवडण्यात आला.

या महिन्याच्या सुरुवातीला काही रिपोर्टनुसार माहिती समोर आली होती की , फॉक्सकॉन ग्रुप भारतात $७०० दशलक्ष ५,७४० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक चीनमधील उत्पादन भारतात स्थलांतरित करण्यासाठी आहे. सध्या Apple च्या आयफोन आणि इतर प्रॉडक्ट्सचे उत्पादन वॉशिंग्टन आणि बीजिंगमध्ये केले जात आहे. मात्र हे संपूर्ण उत्पादन फॉक्सकॉन भारतात आणण्याच्या तयारीमध्ये आहे.

हेही वाचा : अमेरिकेत ‘या’ कारणामुळे जगातील पहिल्या AI रोबोट वकिलावर खटला दाखल; सीईओ म्हणाले, “श्रीमंत वर्गातील …”

फॉक्सकॉनच्या गुंतवणुकीमुळे निर्माण होणाऱ्या १ लाख नोकऱ्या

Apple चा भारतातील प्राथमिक पुरवठादार फॉक्सकॉन भारतात गुंतवणूक करणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या Foxconn (फॉक्सकॉन) तेलंगणा राज्यामध्ये गुंतवणूक करणार आहे. Foxconn ने इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सेटअप उभारण्यासाठी तेलंगणा सरकारसोबत करार केला आहे. यासोबतच या कंपनीने राज्यातील या प्रकल्पात १ लाखांहून अधिक लोकांना रोजगार देण्याचे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे फॉक्सकॉन कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यभरात तब्बल १ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple supplier foxcon company win airpods order invest 1665 crore factory in telagana state tmb 01
First published on: 16-03-2023 at 12:15 IST