scorecardresearch

Premium

Apple कडून भारतीयांसाठी पहिल्यांदाच मोठं सरप्राइज; लाँचच्या दिवशी विकत घेऊ शकता ‘मेड इन इंडिया आयफोन’

iPhone 15 Launch Today: आयफोन-15 सीरीज आज लाँच करण्यात येणार आहे. पण या सीरिजबरोबरच भारतीयांसाठी एक मोठं सरप्राइज कंपनी घेऊन येत आहे, हे सरप्राइज काय आहे जाणून घेऊ

Apple to sell made in India iPhones on launch day for first time
Apple कडून भारतीयांसाठी पहिल्यांदात मोठं सरप्राइज; लाँचच्या दिवशी विकत घेऊ शकता 'मेड इन इंडिया आयफोन' (image Credit-Financial Express)

Apple Wonderlust event 2023: अ‍ॅपल दरवर्षी सप्टेंबरमध्ये आपली नवीन आयफोन सीरिज लाँच करते, त्यानुसार आज (१२ सप्टेंबर) कंपनी आयफोन १५ सीरिजचे अनेक नवीन आयफोन लाँच करणार आहे. त्यामुळे आयफोन चाहत्यांमध्ये आता या नव्या सीरिजची उत्सुकता लागून आहे. अवघ्या काही तासांमध्ये अ‍ॅपलचा वाँडरलस्ट इव्हेंट सुरू होईल, या इव्हेंटमध्ये आयफोन १५ सीरिज लाँच करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अ‍ॅपल कंपनी आपल्या नव्या सीरिजच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांसाठी एक मोठं सरप्राइज घेऊन येत आहे. भारतीय ग्राहकांमध्ये आयफोनची क्रेझ पाहता कंपनीने हे सरप्राइज खास आणले आहे. हे सरप्राईज नेमकं काय आहे आणि आयफोन १५ नेमका कसा असणार आहे जाणून घेऊ…

आज (१२ सप्टेंबर) अ‍ॅपलचा एक मोठा इव्हेंट पार पडणार आहे. या इव्हेंटमध्ये आयफोन १५ हा मुख्य आकर्षणाचा केंद्र असणार आहे. कारण कंपनी पहिल्यांदाच नवीन आयफोन सीरिजच्या लाँचिंगच्या दिवशी भारतात विक्री करण्याची सेवा सुरू करणार आहे. यामुळे लाँचनंतर आजपासूनच भारतीयांना नव्या सीरिजचे मेड इन इंडिया आयफोन खरेदी करता येणार आहेत.

pimpri chinchwad, member of housing societies, online complaint on sarathi portal, sarathi portal
पिंपरी : गृहनिर्माण सोसायटीधारक आता करू शकतात ऑनलाइन तक्रारी… महापालिकेने केली ही सुविधा
iPhone 14 Plus available at Rs 73,999
iPhone 14 Plus स्वस्तात खरेदी करण्याची संधी; ‘या’ ठिकाणी मिळतोय ३६ हजारांचा डिस्काउंट
Chandrayaan 3 Today after 14 days Vikram And Pragyan To Wake Up From Sleep India Will Cross Finger To Get Chance On Moon Study
Chandrayaan-3: १४ दिवसांनी आज निर्णायक क्षण! ‘विक्रम’ व ‘प्रज्ञान’ने फक्त ‘एवढं’ केल्यास भारताला मिळेल मोठं यश
moto edge40 neo launch in india
५० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च झाला MoTo चा ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन, किंमत आणि ऑफर्स एकदा पाहाच

भारतीयांकडून आयफोनच्या प्रत्येक नव्या सीरिजला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. पण, यापूर्वी भारतीय ग्राहकांना नवीन आयफोन सीरिज लाँच झाल्यानंतर ती भारतात येण्यासाठी वाट पाहावी लागत होती. मात्र, आता भारतातच लाँचिंगच्या पहिल्या दिवसापासून आयफोन विक्री होणार असल्यामुळे लाँचनंतर लगेच भारतीय मार्केटमध्ये हे फोन उपलब्ध होणार आहेत.

फॉक्सकॉन कंपनी तयार करणार आयफोन १५

अ‍ॅपल कंपनीने गेल्या महिन्यात त्यांच्या पुरवठादार फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपच्या तामिळनाडूतील कारखान्यात आयफोन १५ चे उत्पादन सुरू केले. अ‍ॅपलचे भारतात आयफोनचे उत्पादन करण्याचे पाऊल हे त्यांचे भारतीय ऑपरेशन्स आणि चीनमधील मुख्य उत्पादन युनिटमधील अंतर कमी करण्याचा आणखी एक प्रयत्न होता. कंपनी आयफोन १४ च्या आधीपासून भारतात त्यांच्या जागतिक उत्पादनाचा फारच छोटा भाग असेंबल करत होती.

टाटा करणार आयफोनची निर्मिती

गेल्या वर्षी भारत आणि चीनमधील आयफोन उत्पादनातील फरक केवळ काही आठवड्यांपर्यंत कमी झाला होता.
अॅपलने मार्चअखेर भारतात आयफोन असेंबल होण्याचे प्रमाण सात टक्क्यांपर्यंत वाढवले. ब्लूमबर्ग न्यूजच्या अहवालानुसार, पेगाट्रॉन कॉर्प आणि विस्ट्रॉन कॉर्पचे कारखाने, भारतातील अॅपलचे इतर पुरवठादार, टाटा समूह लवकरच अधिग्रहित करणार आहेत. यानंतर टाटा ही आयफोन तयार करणारी पहिली भारतीय कंपनी असेल .

आता असे मानले जात आहे की, आयफोन १५ हा गेल्या तीन वर्षांतील आयफोनचा सर्वात मोठा अपडेट असेल, काही फिचर्स प्रथमच रिलीज होण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये पेरिस्कोप टेलिफोटो झूम लेन्स आणि टाइप सी चार्जिंग पोर्टचा समावेश आहे. पण, सॅमसंग आणि गुगल फोनमध्ये यातील काही फिचर्स आधीच दिले आहेत. अशा परिस्थितीत सलग तीन महिन्यांपासून विक्रीत घसरणीचा सामना करत असलेल्या अॅपलला आता आयफोन १५ सीरिजमधून विक्री वाढण्याची मोठी आशा आहे.

ग्राहकांना यापूर्वी ऑफलाइन मार्केटमधून किंवा अॅपल रिसेलर्सकडून आयफोन विकत घ्यावे लागत होते, मात्र यावेळी तुम्ही अॅपल स्टोअरमधून लेटेस्ट आयफोन खरेदी करू शकणार आहात. कंपनीने या वर्षी मुंबईतील Apple Store BKC आणि साकेत, दिल्ली येथे Apple Store लाँच केले आहे. यामुळे ग्राहकांना आयफोनची नवीन सीरिज या स्टोरमधून खरेदी करता येण्याची शक्यता आहे. यामुळे भारतातील अॅपल स्टोअर्समध्ये लाँचिंगच्या दिवशीच नवीन आयफोन विक्री करण्याची पहिलीच वेळ असेल.

अलीकडील अहवालांवर विश्वास ठेवला, तर यावेळी iPhone 15 अंतर्गत एकूण चार मॉडेल्स असू शकतात. यामध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max यांचा समावेश असेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Apple to sell made in india iphones on launch day for first time sjr

First published on: 12-09-2023 at 18:31 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×