Apple ने नुकतेच नवीन स्मार्टवॉच ‘Apple Watch Series 8’ लाँच केली आहे. Apple watch 8 series ला अखेर टेंपरेचर सेन्सर सोबत लाँच करण्यात आले आहे. या नवीन वॉच मध्ये पीरियड सायकल ट्रॅकर सुद्धा दिले आहे. जी महिलांच्या पीरियडला ट्रॅक करण्यासाठी आहे. यासाठी नोटिफिकेशन मिळणार आहे. पीरियड ट्रॅकर बॉडी कंडिशनच्या हिशोबानुसार पीरियड संबंधी अलर्ट करेल. Apple वॉच सीरीज 8 मध्ये पीरियड प्रेडिक्शन व्यतिरिक्त, फॅमिली प्लॅनिंगचे वैशिष्ट्य देखील आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर Apple Watch Series 8 गर्भधारणेबद्दलही सांगू शकते आणि हे सिद्ध झाले आहे. जाणून घ्या कसे…

एका Reddit वापरकर्त्याने दावा केला आहे की, Apple Watch Series 8 ने तिला तिच्या गर्भधारणेबद्दल सांगितले. महिलेने तिच्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, तिचे हृदय गती सामान्यतः ५७ bpm होते परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून Apple Watch हृदय गती ७२bpm म्हणून नोंदवत आहे. जेव्हा महिलेला याबद्दल संशय आला तेव्हा तिने रिसर्च केले, ज्यामध्ये असे दिसून आले की गर्भधारणेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये हृदयाची गती वाढते. यानंतर महिलेने गर्भधारणा चाचणी केली जी पॉझिटिव्ह आली.

आणखी वाचा रिल्स बनवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: Instagram आणतोय् ‘हा’ नवीन फिचर, यामुळे वाढेल तुमचे उत्पन्न…

महिलेने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘स्मार्टवॉचला माहित आहे की मी गरोदर आहे, तरीही मला गर्भधारणेची कल्पना नव्हती. हे घड्याळ नसते तर मला हे खूप उशिरा कळले असते, कारण माझी पाळीही वेळेवर आली.

अॅपलने वॉच सीरीज 8 बद्दल असे म्हटले होते की, हे घड्याळ तुम्हाला कुटुंब नियोजनात मदत करू शकते. तसेच तुम्हाला पीरियडसबद्दल अचूक माहिती देईल. Apple Watch Series 8 ची सुरुवातीची किंमत ४५ हजार ९०० रुपये आहे.